खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी

By वैभव गायकर | Published: July 15, 2023 07:53 PM2023-07-15T19:53:09+5:302023-07-15T19:53:29+5:30

एक 'ड्रंक अँड ड्राइव्ह'सह सुरक्षा यंत्रणेबाबतच्या त्रुटी आल्या समोर

Inspection of private buses at Kharghar, Kamothe toll booth | खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी

खारघर, कामोठे टोल नाक्यावर खाजगी बसची तपासणी

googlenewsNext

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकाडून  कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस तपासणी  मोहीम हाती असून पहिल्याच दिवशी सात वाहनावर कारवाई केल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस मालक आणि चालकाचे धाबे दणाणले आहे.समृद्धी महामार्गावर नुकताच झालेल्या अपघातात अनेक प्रवाशांचा जीव गेला.मुंबई पुणे महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात खाजगी  बस धावत असल्याने पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने याठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गावर  ट्रॅव्हल्सपटली होऊन जागीच पेट घेतल्यामुळे  बसमध्ये झोपलेल्या 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली होती . दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स   बस चालक मालक परिवहन विभागाच्या ‘कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस परवाना नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्यामुळे   पनवेल प्रादेशिक विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तारखेपासून रोजी पासून मोहीम हाती घेण्यात आली आहे . खारघर,कामोठे  टोल नाक्यावर  शेकडो  कॉन्टॅक्ट कॅरेज बसेसची  तपासणी करण्यात आली असता.अनेक सुरक्षा नियम धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. बस चालकांची    ब्रिथ अनालायझर या उपकरणाद्वारे  तपासणी केली  असता.एक बस चालक  मद्य प्राशन केले असल्याचे समोर आले आहे. तपासणीच्या वेळी आपत्कालीन दरवाजा, फर्स्ट एड बॉक्स, अग्निशामक यंत्रणा ,तात्पुरता परवाना, योग्यता प्रमाणपत्र, लाल परावर्तक ,अवैधरित्या मालवाहतूक, प्रेशर हॉर्न ,ड्यजलिंग लाईट ,वायपर आदींची यांची तपासणी करण्यात येत असल्यामुळे  कॉन्ट्रॅक्ट कॅरेज’ बस मालक आणि चालकाचे धाबे दणाणले आहे. 

प्रतिक्रिया - 
मागील तीन दिवसांपासून खारघर,कामोठे टोल नाक्यावर खाजगी प्रवासी बसची तपासणी केली जात आहे.शेकडो बसची तपासणी करण्यात आली असुन यामध्ये एक वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.इतर बसेस मध्ये देखील फायर यंत्रणा,प्राथमोपचार किट आदींसह काही त्रुटी आढळून आल्या.याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई केली असुन बसमध्ये बसताना प्रवाशांनी देखील आपल्या परीने अशा वाहनांबाबत माहिती घ्यावी.
-अनिल पाटील (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,पनवेल)

Web Title: Inspection of private buses at Kharghar, Kamothe toll booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.