शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पुनर्वसन क्षेत्रातील कामांची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:06 AM

विमानतळ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांचे पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.

नवी मुंबई : विमानतळ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांचे पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सोमवारी या क्षेत्राला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.विमानतळबाधित दहा गावांतील सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, वहाळ आणि कुंडे वहाळ येथे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यानुसार या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांवर सिडकोने भर दिला आहे. पुनर्वसन व पुन:स्थापनेअंतर्गत २२२ हेक्टर जागेवर नवीन वसाहत उभारली जाणार आहे. त्यानुसार या क्षेत्रात शाळा, नागरी आरोग्य केंद्र, समाजमंदिर आदी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच महिला भवन, अंगणवाडी, प्रशासकीय भवन व स्मशानभूमीची कामे प्रगतिपथावर आहेत.स्थलांतरित होणाºया दहा गावांपैकी कोपर, कोल्ही, वरचे ओवळे व वाघिवली या गावांतून सरासरी ९५ टक्के ग्रामस्थांनी आपली बांधकामे पाडून स्थलांतर केले आहे. स्थलांतरित जागेवर अनेकांनी बांधकामेही सुरू केली आहेत. आतापर्यंत २७२ प्रकल्पग्रस्तांनी बांधकाम परवानगी घेतली आहे. लोकेश चंद्र यांनी या पुनर्वसन व पुन:स्थापना पॉकेट्सला भेट देऊन सर्व कामांची पाहणी केली. त्याचप्रमाणे पुष्पकनगर नोडमध्ये सुरू असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि इतर विकासकामांचा आढावा घेतला.>भूखंडावरील विकासकामांसाठी अतिरिक्त सुविधाआंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोने सर्वोत्तत पुनर्वसन पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर त्यांना देण्यात आलेल्या भूखंडावरील विकासकामांसाठी नवी मुंबई जमीन विनियोग (सुधारित) नियमावलीत आणखी काही सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विमानतळबाधितांना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच भूखंडांच्या विकासासाठी देय असलेले नोंदणी शुल्क प्रकल्पग्रस्तांना तत्काळ परत दिले जाणार आहे. सिडकोच्या नियमानुसार एखाद्या भूखंडावर चार वर्षांत ७५ टक्के बांधकाम करणे अनिवार्य आहे. विशेष बाब म्हणून विमानतळबाधितांना ही मुदत सहा वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या काळात त्यांनी ३३ टक्के बांधकाम करणे अनिवार्य केले आहे. विमानतळबाधितांना आपल्या भूखंडांचा वापर निवासी व वाणिज्य प्रयोजनासाठी करता येणार आहे.बांधकाम परवानगीसाठी लागणारे शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे. त्याशिवाय विकास शुल्क, पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा आदी शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोने घेतला आहे. सुधारित नियमावलीनुसार विमानतळबाधितांना देण्यात आलेले भूखंडाचे लिज प्रीमियम पुढील ६0 वर्षांसाठी प्रति वर्षाला केवळ एक रुपया इतके आहे. सुधारित बदलामुळे विमानतळबाधितांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या विकासाला गती मिळेल.