उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:09 PM2019-02-01T23:09:53+5:302019-02-01T23:10:04+5:30

३५८ वा विजय दिन; ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी जपल्या स्मृती; युद्धभूमीला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली

Inspiration for the Umbarakhinda youth | उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : खालापूर तालुक्यामधील उंबरखिंडची युद्धभूमी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरू लागली आहे. ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी १६६१ मधील युद्धाच्या स्मृती जपल्या असून येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून येणाºयांची संख्याही वाढू लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा विश्वभर प्रसिद्ध आहे. स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांनी स्वत: अनेक लढायांचे नेतृत्व केले. त्यामध्ये महत्त्वपूर्ण लढाईमध्ये उंबरखिंडचाही समावेश आहे. पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाने ३० हजारांची फौज सोबत देऊन कारतलबखान व रायबागन यांना कोकण काबीज करण्यासाठी पाठविले. ही फौज लोहगडाच्या पायथ्याने लोणावळ्यावरून उंबरखिंडीतून खाली उतरू लागली. घनदाट अरण्य व अरुंद रस्ते यांच्यामध्ये महाराजांनी फौजेची कोंडी केली. त्यांना मिळणाºया पाण्याचीही रसद तोडली व मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ३० हजार सैन्याचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६६१ ला कारतलब खानाने शरणागती पत्करली. तेव्हापासून उंबरखिंड इतिहासामध्ये अजरामर झाली. प्रत्येक वर्षी शेकडो शिवप्रेमी याठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण देणाºया संस्थेमधील कमांडो एम. एम. औटी यांनी १९७४ मध्ये उंबरखिंडीमधील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यास सुरवात केली. सन २००१ मध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर क्लब या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी विजय दिन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली. २००४ मध्ये ठिकाणी विजयस्तंभ उभारण्याचे भूमिपूजन केले व २००७ मध्ये विजयाचे प्रतीक असणाºया स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून याठिकाणी भेट देणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

उंबरखिंड पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. लोणावळ्यापासून आंबेनळीच्या अवघड डोंगरातील पायवाटेने उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत येत आहेत. डोंगर उतरताना अजूनही अरुंद पायवाट व बाजूूला दाट झाडी आहे. डोंगरावरून चावणी गावही स्पष्ट दिसते. यामुळे कारतलब खानाचे सैन्य कसे उतरले असेल व महाराजांनी त्यांची कोंडी करून कशाप्रकारे पराभव केला याविषयीच्या घटनांना या प्रवासात उजाळा मिळत आहे. येणाºया नागरिकांना युद्धाची माहिती व्हावी यासाठी शिवदुर्ग मित्र संस्थेने माहितीफलकही लावले आहेत.

विजयस्तंभावर युद्धाची माहिती
उंबरखिंडीमध्ये उभारलेल्या विजयस्तंभावर १६६१ मधील युद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. महाराजांनी आयुष्यात स्वत: सहभाग घेतलेल्या लढाईमध्ये या लढाईचा समावेश आहे. मावळ्यांचा पराक्रम व गनिमी कावा याचे दर्शन या लढाईतून घडत आहे. विजयस्तंभाच्या दुसºया बाजूला महाराजांचे वृक्षसंवर्धन व लागवडीविषयी माहिती देणाºया अज्ञापत्रातील मजकूर देण्यात आला आहे.

व्याख्यानाचे आयोजन
उंबरखिंडीमध्ये शनिवारी ३५८ वा विजयदिन साजरा केला जात आहे. ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्यावतीने प्रत्येक वर्षी २ फेब्रुवारीला हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी दिगंबर पडवळ यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. सकाळी नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ चौक येथून कार्यक्रमस्थळापर्यंत शिवज्योत आणली जाणार आहे.

उंबरखिंडच्या लढाईचे महत्त्व व तो समरप्रसंग राज्यातील घराघरात पोहचावा यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या व पंचायत समितीच्या सहकार्याने येथे विजयदिन कार्यक्रम साजरा केला जात असून २००७ मध्ये विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.
- सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र लोणावळा

Web Title: Inspiration for the Umbarakhinda youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.