अत्यावश्यक सेवेकऱ्यांना बाधा झाल्यानं पनवेलकरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:37 AM2020-04-27T00:37:16+5:302020-04-27T00:37:29+5:30

डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, मेडिकलचालक, दुकानदार, सीआयएसएफचे जवान, सफाई कर्मचारी आदीना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Interfere with essential servants | अत्यावश्यक सेवेकऱ्यांना बाधा झाल्यानं पनवेलकरांची चिंता वाढली

अत्यावश्यक सेवेकऱ्यांना बाधा झाल्यानं पनवेलकरांची चिंता वाढली

Next

वैभव गायकर
पनवेल : पनवेल परिसरात कोविड-१९ च्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यात अत्यावश्यक सेवेतील घटकांचा सर्वाधिक समावेश आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, मेडिकलचालक, दुकानदार, सीआयएसएफचे जवान, सफाई कर्मचारी आदीना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. यातील बहुतांश व्यक्ती या मुंबईत विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात नव्याने कोविडचे संसर्ग होणारे रुग्ण कमी आहेत. मात्र, मुंबईस्थित विविध ठिकाणी कार्यरत असलेले नागरिक कोरोनाचे शिकार बनत आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार, पनवेल महापालिका हद्दीत ५२ तर पनवेल ग्रामीण भागात ९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पनवेलमध्ये सध्याच्या घडीला उपजिल्हा रुग्णालय (कोविड-१९ रुग्णालय) पनवेल, एमजीएम रुग्णालय कामोठे तसेच नवी मुंबईमधील खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, नव्याने वाढणारे रुग्ण मुंबईमधून संसर्ग होऊन पनवेलमध्ये वास्तव्यास असणारे आहेत.
बहुतांश व्यक्ती अत्यावश्यक सेवेतील असल्याने पालिका प्रशासन याबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नाही.
पनवेल महापालिकेने खारघर शहरातील सेक्टर १५ मधील घरकूल सोसायटी, पनवेल शहरातील तक्का गाव, कळंबोलीमध्ये सीआयएसएफचे संकुल कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले आहे. या व्यतिरिक्त पनवेल ग्रामीणमधील विचुंबे, भिंगारवाडी आदी कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केले आहे. येथील नागरिकांना परिसराबाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
।कोरोना योद्धांना शहीद घोषित करण्याची मागणी
उरण : कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लढ्यात अहोरात्र झटणाºया शासकीय अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, पत्रकार आणि सफाई कामगार यांच्यासह अन्य शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना संसर्गाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणी उरण शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना देण्यात आले आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूशी लढताना कोरोना योद्धांना जीव गमावण्याची परिस्थिती ओढावल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर येऊ शकते, अशा योद्धांना शासकीय मदतीसह शासनाने शहीद म्हणून घोषित करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. या प्रसंगी उरणच्या माजी नगरसेविका अफशा मुकरी व माजी नगरसेवक बबन कांबळे उपस्थित होते.
>पनवेल परिसरात कोरोनाचा संसर्ग थांबविण्यास प्रशासनाला यश आले आहे. सध्याच्या घडीला नव्याने वाढणारे बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण मुंबईमध्ये कार्यरत असलेले नागरिक आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील घटकांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील घटकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- गणेश देशमुख, आयुक्त,
पनवेल महानगरपालिका

--------------------
पनवेल परिसरातून मुंबईत कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. रविवारी पनवेल परिसरात तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. या तीन रुग्णांमध्ये एक परिचारिका, दुसरा बेस्ट वाहनचालक व तिसरा मुंबईमधील एका कंपनीत सीए म्हणून कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे, अशा वेळी पनवेल परिसरात मुंबईतून संसर्गाचा धोका वाढत आहे.

Web Title: Interfere with essential servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.