उरणमध्ये इंटरनेट सेवा कोलमडली

By admin | Published: June 14, 2017 03:20 AM2017-06-14T03:20:18+5:302017-06-14T03:20:18+5:30

तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा,

Internet service collapsed in Uran | उरणमध्ये इंटरनेट सेवा कोलमडली

उरणमध्ये इंटरनेट सेवा कोलमडली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : तालुक्यात एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून पुरती कोलमडली आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदि विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. बंद पडलेल्या इंटरनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा निकालही शेकडो विद्यार्थी, पालकांना सायबर कॅफेत जाऊन पैसे मोजून पहावा लागल्याने एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
उरण तालुक्यातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा मागील महिनाभरापासून कोलमडली आहे. खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. याबाबत तक्रार करण्याचीही सोय उरलेली नाही. कारण तक्रार घेवून जाणाऱ्या ग्राहकांना उरण एमटीएनएलचे अधिकारी तकलादू आणि थातूरमातूर उत्तरे देवून वाटेला लावून देत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संतापाचा पारा अधिकच चढू लागला आहे. मंगळवारी दहावीचा रिझल्ट आॅनलाइन जाहीर करण्यात आला होता. मात्र बंद पडलेल्या इंरटनेट सेवेमुळे मंगळवारी दहावीचा रिझल्टही शेकडो विद्यार्थी पालकांनी सायबर कॅॅफेत जावून पैसे मोजून पहावा लागला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता उरण जासई दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामामुळे वारंवार आॅप्टिकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडली असल्याची माहिती डीएम एल. आर. यादव यांनी दिली. दुरुस्तीचे काम सुरू असून अधिक माहितीसाठी जीएम कार्यालयाशी संपर्क साधावा असा सल्लाही त्यांनी दिला.
एमटीएनएलचे जीएम नंदलाल सत्यदेव यांनीही उरण परिसरातील इंटरनेटसेवा मागील पाच दिवसांपासून कोलमडली असल्याचे मान्य करून दुरुस्तीनंतरच सेवा पूर्वपदावर येणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र उरण येथील एमटीएनएलच्या दुरुस्तीचे काम अद्याप तरी सुरू झाले नसल्याने इंटरनेट सेवा कधी पूर्वपदावर येईल याची शाश्वती नसल्याचे कर्मचाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारी जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.
मात्र उरण परिसरातील कोलमडलेल्या इंटरनेट सेवेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

Web Title: Internet service collapsed in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.