परिवहनचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

By admin | Published: January 13, 2016 02:30 AM2016-01-13T02:30:48+5:302016-01-13T02:30:48+5:30

महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने २0१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षासाठी २८८ कोटी ७१ लाख १४ हजार जमेचा व २८८ कोटी ६६ लाख ९३ हजार रूपये खर्चाचा असा ५ लाख २१ हजार रूपये

Introducing the Balance of Transport budget | परिवहनचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

परिवहनचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने २0१६-१७ या अर्थसंकल्पीय वर्षासाठी २८८ कोटी ७१ लाख १४ हजार जमेचा व २८८ कोटी ६६ लाख ९३ हजार रूपये खर्चाचा असा ५ लाख २१ हजार रूपये शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला आहे.
उपक्रमाने २0१५-१६ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या सर्व योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी चालू अर्थसंकल्पातील जमा आणि खर्चाचा मेळ बसविताना व्यवस्थापनाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना याची खबरदारी घेवून जमा आणि खर्चाचा ताळेबंद मांडण्यात आला आहे. आगामी वर्षाच्या अंदाजपत्राच्या जमेच्या बाजूत पीपीपी तत्त्वावर बस टर्मिनस विकसित करून पाच कोटी प्रवासी भाड्याद्वारे ९५ कोटी २७ लक्ष व इतर १५ कोटी १0 लाखांच्या महसूल गृहीत धरण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेकडून या आगामी वर्षात ५२ कोटींचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. विशेष म्हणजे जेएनएनयूआरएम प्रकल्प-२ अंतर्गत आगामी वर्षात परिवहन उपक्रमाला एकही रुपया मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आगामी वर्षात परिवहन उपक्रमाने नवीन बसेस खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे. तसेच खासगी सहभागातून बससेवा सुरू करण्यासाठी ६२ कोटी २७ लाख, आगार विकसित करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख, आस्थापन, कार्यशाळेवर १७ कोटी १२ लाख रुपये, ई गव्हर्नन्ससाठी ५ कोटी, हायब्रिड बस खरेदीसाठी ४ कोटी ८0 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
परिवहन उपक्रमाने सन २0१५-१६ चा चालू वर्षाचा ५५३ कोटी १६ लाख ८४ हजार रूपये खर्चाचा असा ९ लाख २३ हजार रूपये शिल्लकीच्या अर्थसंकल्पात सुधारणा करून तो १५ लाख ३४ हजार रूपये शिल्लकीचा करण्यात आला होता. त्याअनुषंगानेच उपक्रमाने आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी मंगळवारी हा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर केला.

खासगी बस सुविधा
खासगी कंत्राटदारामार्फत प्रवासी बसेस सुरू करण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून मागील दोन वर्षापासून चाचपणी सुरू आहे. आगामी अर्थसंकल्पात खासगी बससेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी ६२ कोटी २७ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच आगार विकसित करण्यासाठी ५ कोटी ८५ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

Web Title: Introducing the Balance of Transport budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.