उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:44 PM2019-12-30T22:44:58+5:302019-12-30T22:45:01+5:30

सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार; कचरा न टाकण्याचे आदेश

Inundation of the forest threatens the survival of onions | उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

उरणमधील कचऱ्यामुळे कांदळवनाचे अस्तित्व धोक्यात

Next

नवी मुंबई : उरण नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा बोरी पाखाडीजवळील कचरा भुमीवर टाकला जात असून त्यामुळे कांदळवन नष्ट होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली आहे. समितीने कांदळवनामध्ये कचरा टाकू नये अशा सूचना दिल्या आहेत.

नगरपालिका कार्यक्षेत्रामधील कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हाअधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. जिल्हाअधिकाºयांनी सन २००० मध्ये हनुमान कोळीवाड्याजवळील बोरी पाखाडी येथे भूखंड उपलब्ध करून दिला होता. त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचºयामुळे कांदळवन नष्ट होत असल्याची तक्रार नॅट कनेक्ट संस्थेचे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे नंदकुमार पवार यांनी केली होती. याविषयी कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीमध्येही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून जिल्हाअधिकारी प्रशासनास कांदळवनावर कचरा टाकला जावू नये. कांदळवनात जो कचना टाकला असेल तो काढून घेण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. यासाठी एक समितीने घटनास्थळी जावूनही पाहणी केली होती. कांदळवन समितीच्या आदेशामुळे कचरा भुमीमुळे त्रस्त असणाºया नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पर्यावरण प्रेमींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बोरी पाखाडी मधील कचरा भुमीमुळे परिसरामधील नागरिक त्रस्त झाले होते. कांदळवन नष्ट होवून पर्यावरणाची हानी होत होती. याविषयी अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत असून कांदळवन समितीने दिलेल्या निर्णयामुळे या लढ्यास यश आले आहे.
- बी. एन. कुमार, संस्थापक, नॅड कनेक्ट फाऊंडेशन

कचरा भुमीविषयी कांदळवन समितीने काही आदेश दिले असल्याचे ते अद्याप आमच्यापर्यंत पोहचलेले नाहीत. जिल्हाअधिकाºयांनी दिलेल्या जमीनीवरच कचºयाचे विल्हेवाट लावली जात आहे. खारफुटी नष्ट होणार नाही याची काळजी घेत आहोत. पर्यायी जमीन मिळविण्यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- अवधूत तावडे, मुख्याधीकारी, उरण नगरपालिका

Web Title: Inundation of the forest threatens the survival of onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.