शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एपीएमसी वाहतूक चौकीसमोर अवैध पार्किंग

By admin | Published: May 16, 2017 12:54 AM

एपीएमसी वाहतूक चौकीपासून माथाडी भवनपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे; परंतु येथील बसस्टॉपासून सर्व्हिस रोडवरही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एपीएमसी वाहतूक चौकीपासून माथाडी भवनपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे; परंतु येथील बसस्टॉपासून सर्व्हिस रोडवरही अवैधपणे खासगी वाहने उभी केली जात असून, वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईमधील वाहतुकीची सर्वात गंभीर समस्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात निर्माण झाली आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यामध्ये व बेशिस्तपणा थांबविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणारे व मार्केटमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या ट्रक, टेम्पोचालकांची पिळवणूक करणारे वाहतूक पोलीस रोडवरील अवैध पार्किंगकडे पूर्णपणे दुर्र्लक्ष करत आहेत. पोलीस चौकीला लागून असलेल्या बसथांब्यासमोर खासगी कार उभ्या करण्यात येत आहेत. बसथांब्यापासून ते माथाडी भवनपर्यंतचा रोड व सर्व्हिस रोडवर नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत; परंतु पोलिसांचे आदेश धाब्यावर बसवून मुख्य रोड व सर्व्हिस रोडवरही खासगी वाहने उभी केली जात आहेत. नागरिकांनी तक्रारी करूनही पोलीस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. एपीएमसी वाहतूक पोलिसांनाच शिस्त लावण्याची वेळ आली आहे. वाहतुकीच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. चौकीसमोरील अवैध पार्किंग थांबविता येत नसल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. येथील अवैध पार्किंगविषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करून व छायाचित्र काढून त्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.