पालिका अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, स्थायी समितीमध्ये लोकप्रतिनिधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:45 AM2018-12-22T03:45:09+5:302018-12-22T03:45:28+5:30
स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली.
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली.
सभेमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती देण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याला बोलावण्यात आले. यामुळे शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. जबाबदार अधिकाºयांनीच उत्तरे दिली पाहिजेत. कनिष्ठ अभियंत्यांना उत्तरे देण्यासाठी बोलवून सभेचा दर्जा कमी करू नये, अशी मागणी केली. अभियांत्रिकी विभागाला अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी काही अभियंत्यांच्या मालमत्ता तपासण्याची गरज असल्याची मागणी केली. एक अधिकाºयाकडे आठ गाड्या आहेत. त्याच्या घराखाली या गाड्या लावण्यात येत असून ही मालमत्ता आली कुठून हे तपासणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला की त्यांच्या नातेवाइकांची व समर्थकांची अनधिकृत बांधकामे शोधली जातात; परंतु अधिकाºयांच्या चौकशा कधी व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. गाड्यांचा ताफा असणारा अधिकारी कोण आहे, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही प्रशासनाच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली. शहर अभियंत्यांनी एक महिन्यापूर्वी प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव आणण्याचे आश्वासन दिले होते. या प्रश्नावर उत्तर देताना सहशहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी लवकरच जुईनगरमधील कामे केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.