शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

पालिका अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, स्थायी समितीमध्ये लोकप्रतिनिधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:45 AM

स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली.

नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली.सभेमध्ये नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची माहिती देण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याला बोलावण्यात आले. यामुळे शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. जबाबदार अधिकाºयांनीच उत्तरे दिली पाहिजेत. कनिष्ठ अभियंत्यांना उत्तरे देण्यासाठी बोलवून सभेचा दर्जा कमी करू नये, अशी मागणी केली. अभियांत्रिकी विभागाला अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी काही अभियंत्यांच्या मालमत्ता तपासण्याची गरज असल्याची मागणी केली. एक अधिकाºयाकडे आठ गाड्या आहेत. त्याच्या घराखाली या गाड्या लावण्यात येत असून ही मालमत्ता आली कुठून हे तपासणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला की त्यांच्या नातेवाइकांची व समर्थकांची अनधिकृत बांधकामे शोधली जातात; परंतु अधिकाºयांच्या चौकशा कधी व कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. गाड्यांचा ताफा असणारा अधिकारी कोण आहे, याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनीही प्रशासनाच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली. शहर अभियंत्यांनी एक महिन्यापूर्वी प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव आणण्याचे आश्वासन दिले होते. या प्रश्नावर उत्तर देताना सहशहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी लवकरच जुईनगरमधील कामे केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNavi Mumbaiनवी मुंबई