आत्महत्येप्रकरणी नातेवाइकांची चौकशी; तळोजा प्रकरणी पोलिसांच्या तपासास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 02:57 AM2020-02-24T02:57:23+5:302020-02-24T02:57:32+5:30

तळोजा फेज १ च्या सेक्टर-९ येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

Investigation of relatives for suicide | आत्महत्येप्रकरणी नातेवाइकांची चौकशी; तळोजा प्रकरणी पोलिसांच्या तपासास वेग

आत्महत्येप्रकरणी नातेवाइकांची चौकशी; तळोजा प्रकरणी पोलिसांच्या तपासास वेग

googlenewsNext

पनवेल : तळोजा फेज १ च्या सेक्टर-९ येथील एका बंद घरामध्ये शनिवारी चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. त्यानुसार आत्महत्या केलेल्या या कुटुंबीयांच्या नातेवाइकांची चौकशी करणार असल्याचे तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी सांगितले.

दिल्ली येथील नितेश उपाध्याय याने आपली पत्नी बबली उपाध्याय, मुलगी नव्या आणि मुलगा ओम यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली होती. तळोजा पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांच्या नातेवाइकांचा शोध चालू केला होता. अखेर त्यांचे नातेवाईक दिल्ली येथे असून त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला आहे. या प्रकरणी या नातेवाइकांचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.

सोमवारी उपाध्याय यांचे नातेवाईक दिल्लीहून तळोजा येथे येणार असून हे मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हे चारही मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ चव्हाण यांनी दिली. याप्रकणी अधिक तपास सुरू आहे.

रहिवाशांचीही चौकशी
तब्बल दीड महिन्यापूर्वी हत्या व आत्महत्येचा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. असे असले तरी शिव कॉर्नर सोसायटीतील मयत कुटुंबाचे शेजारी व इतरांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. दीड महिन्यापासून रूम आतून बंद असतानाही शेजाऱ्यांनी एकदाही चौकशी केली नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांचीसुद्धा पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Investigation of relatives for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.