दुचाकीस्वारांचे मृत्यूला आमंत्रण

By admin | Published: November 11, 2015 12:27 AM2015-11-11T00:27:00+5:302015-11-11T00:27:00+5:30

पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे.

Invitation to two-wheelers death | दुचाकीस्वारांचे मृत्यूला आमंत्रण

दुचाकीस्वारांचे मृत्यूला आमंत्रण

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. महामार्गावरून प्रवास करतानाही हेल्मेटचा वापर केला जात नसून पोलिसांनी जानेवारीपासून तब्बल ४३,७१७ जणांवर कारवाई करून ४४ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये सायन - पनवेल महामार्ग, मुंबई - पुणे, गोवा महामार्ग, पनवेल ते जेएनपीटी रोड, ठाणे बेलापूर व पामबीच रोडवर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. जेएनपीटी वगळता इतर सर्व मार्ग सुस्थितीमध्ये असून चालक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात. यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
मोटारसायकल चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. परंतु या परिसरातील ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापरच करत नाहीत. दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाहतूक विभाग जनजागृती करत असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे.
वाहतूक पोलिसांनी गतवर्षी जानेवारी ते आॅक्टोबरअखेर तब्बल ३६४९९ दुचाकीस्वारांवर कारवाई करून तब्बल ३८ लाख २६ हजार रूपये दंड वसूल केला होता. यंदा ४३७१७ वाहनांवर कारवाई केली असून ४४ हजार ९८६ रुपये दंड वसूल केला आहे. रोज जवळपास दीडशे ते दोनशे मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली जात आहे. पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. हेल्मेट हे ओझे नाही. ते सुरक्षा कवच असून प्रत्येकाने त्याचा वापर केलाच पाहिजे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे दुचाकीस्वारांनी कारवाई करण्याची वेळ येवू न देता स्वत:हून दुचाकीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. दुचाकीस्वारांमध्ये स्टंटबाजीचे प्रमाणही वाढत आहे. पामबीचवर धूमस्टाईल दुचाकी चालविणारांची संख्या वाढत असून त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. १८ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या हातामध्येही पालक दुचाकी देत आहेत. चालक परवाना नसलेले तरूण दिवसभर शहरात भटकत असून एकाच मोटारसायकलवर तीन ते चार जण प्रवास करून अपघातास आमंत्रण देत आहेत.

Web Title: Invitation to two-wheelers death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.