शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुचाकीस्वारांचे मृत्यूला आमंत्रण

By admin | Published: November 11, 2015 12:27 AM

पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. महामार्गावरून प्रवास करतानाही हेल्मेटचा वापर केला जात नसून पोलिसांनी जानेवारीपासून तब्बल ४३,७१७ जणांवर कारवाई करून ४४ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये सायन - पनवेल महामार्ग, मुंबई - पुणे, गोवा महामार्ग, पनवेल ते जेएनपीटी रोड, ठाणे बेलापूर व पामबीच रोडवर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. जेएनपीटी वगळता इतर सर्व मार्ग सुस्थितीमध्ये असून चालक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात. यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मोटारसायकल चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. परंतु या परिसरातील ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापरच करत नाहीत. दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाहतूक विभाग जनजागृती करत असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी गतवर्षी जानेवारी ते आॅक्टोबरअखेर तब्बल ३६४९९ दुचाकीस्वारांवर कारवाई करून तब्बल ३८ लाख २६ हजार रूपये दंड वसूल केला होता. यंदा ४३७१७ वाहनांवर कारवाई केली असून ४४ हजार ९८६ रुपये दंड वसूल केला आहे. रोज जवळपास दीडशे ते दोनशे मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली जात आहे. पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. हेल्मेट हे ओझे नाही. ते सुरक्षा कवच असून प्रत्येकाने त्याचा वापर केलाच पाहिजे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे दुचाकीस्वारांनी कारवाई करण्याची वेळ येवू न देता स्वत:हून दुचाकीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. दुचाकीस्वारांमध्ये स्टंटबाजीचे प्रमाणही वाढत आहे. पामबीचवर धूमस्टाईल दुचाकी चालविणारांची संख्या वाढत असून त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. १८ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या हातामध्येही पालक दुचाकी देत आहेत. चालक परवाना नसलेले तरूण दिवसभर शहरात भटकत असून एकाच मोटारसायकलवर तीन ते चार जण प्रवास करून अपघातास आमंत्रण देत आहेत.