शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक

By सूर्यकांत वाघमारे | Published: April 22, 2024 7:16 PM

विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे.

नवी मुंबई: बेलापूर येथे राहणाऱ्या विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या प्रयत्नात आयपीएस मिळूनदेखील त्याहून अधिक रँक मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी पाचव्यांदा परीक्षा दिली. त्यामध्ये देशात १२६ तर राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. अभिनंदनाचा बॅनर लावण्यासाठी पोलिसांची परवानगी मागण्यास गेल्यावर त्यांचे हे धवल यश लक्षात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये नवी मुंबईकरांनी देशभर नावलौकिक मिळवला आहे. बेलापूर येथे राहणाऱ्या विवेक सोनावणे यांनीही स्वबळावर धवल यश मिळवले आहे. चौथ्यांदा केलेल्या प्रयत्नात त्यांनी ७९२ रँक मिळवून आयपीएसपद मिळवले होते. 

मात्र, आपली क्षमता त्याहून अधिक असल्याचा त्यांना विश्वास होता. यामुळे पाचव्यांदा त्यांनी परीक्षा दिली अन आयएएस करिता पात्र ठरले. मुलाखतीमध्येच त्यांनी १९३ गुण मिळवले होते. वडील महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर आहेत, तर आई गृहिणी. घरची परिस्थती सामान्य असल्याने कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची पायरी न चढता स्वतःच तयारी करण्याची मनाची गाठ त्यांनी बांधली होती. यातून अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेचा असलेला पूर्वानुभव त्यांनी पुरेपूर वापरला. त्यात आईवडिल व बहिणीची मिळालेली साथ ते महत्त्वाची मानतात. वर्षभर कुठेही नोकरी न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण हे यश मिळवू शकलो याचा आनंद ते व्यक्त करतात.

पोलिसही झाले अवाक्विवेक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राहत्या परिसरात त्यांचा बॅनर लावण्याच्या परवानगीसाठी त्यांचे मित्र मंडळी सीबीडी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांच्यातल्या चर्चेदरम्यान विवेक यांचे यश वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या कानी पडले. स्वतः अभ्यास करून त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याने पोलिसांच्या वतीने त्यांचा पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbelapur-acबेलापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी