सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

By admin | Published: November 7, 2015 11:33 PM2015-11-07T23:33:14+5:302015-11-07T23:33:14+5:30

सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा

Irregular water supply from Hedavane dam of CIDCO | सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

Next

- दत्ता म्हात्रे,  पेण
सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. सर्व ग्रामपंचायतीने याविषयी तक्रारी करूनही व मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केल्यानंतरही शासनाने अद्याप या समस्येचे दखल घेतलेली नसून या ६० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे भिषण दुष्काळ पडला आहे. अनेक परिसरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिवाळीच्या अगोदरपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणचे पाणी दुषीत असल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी दिला असतानाही नागरिकांना पर्याय नसल्याने तेच पाणी प्यावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील खारीपाट परिसरातील ८४ गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. याच या धरणातून पनवेल तालुक्यातील सिडको नोडमध्येही पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू सिडकोने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून ते नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. परंतू ज्या परिसरात हे धरण आहे तेथील नागरिकांना मात्र प्रक्रिया न केलेले दुषीत पाण्याचाच पुरवठा केला जात आहे. तिन महिन्यांपासून सुरू असलेल्या दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याचे नमुणे ग्रामीण पाणीपुरवठा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. खारेपाट परिसरात एकूण १२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायती व तेथील सरपंचांनी या समस्येविषयी सिडको, संबंधीत विभाग व राज्य शासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. दुषीत पाण्याच्या अहवालाच्या प्रतीही पाठविल्या आहेत. पंरतू एकही अस्थापनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सिडकोने त्यांनी विकसीत केलेल्या नोडमधील नागरिकांसाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. परंतू ज्यांच्या जमीनीवर धरण बांधले त्या नागरिकांसाठी मात्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवरही तक्रारी केल्या आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने दुषीत पाणीच प्यावे लागत आहे. या पाण्याचा आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पाणी उकळून पिण्यास सुरवात केली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी फिल्टरचा उपयोग सुरू केला आहे. परंतू यामुळे समस्या संपलेली नाही. शासनाने योग्य उपाययोजना केली नाही तर या परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

मुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष
८४ गावांमधील ग्रामस्थांनी शासनस्तरावर अनेक तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी विशेष पोर्टल तयार केले आहे. सदर पोर्टलवरही नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु मुख्यमंत्रीही या समस्येकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतींचा पाठपुरावा : तिन महिन्यांपासून नागरिकांना दुषीत पाणीपुरवठा होत आहे. सर्वच ग्रामपंचायतीच्या संरपंचांनी याविषयी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. हेटवणे धरणातून पनवेल परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्याचधर्तीवर जलशुद्धीकरण केंद्र या परिसरातील नागरिकांसाठी उभे करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Irregular water supply from Hedavane dam of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.