सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा
By Admin | Published: November 10, 2015 12:23 AM2015-11-10T00:23:21+5:302015-11-10T00:23:21+5:30
सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा
दत्ता म्हात्रे , पेण
सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. सर्व ग्रामपंचायतीने याविषयी तक्रारी करूनही व मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केल्यानंतरही शासनाने अद्याप या समस्येचे दखल घेतलेली नसून या ६० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे भिषण दुष्काळ पडला आहे. अनेक परिसरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिवाळीच्या अगोदरपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणचे पाणी दुषीत असल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी दिला असतानाही नागरिकांना पर्याय नसल्याने तेच पाणी प्यावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील खारीपाट परिसरातील ८४ गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. याच या धरणातून पनवेल तालुक्यातील सिडको नोडमध्येही पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू सिडकोने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून ते नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. परंतू ज्या परिसरात हे धरण आहे तेथील नागरिकांना मात्र प्रक्रिया न केलेले दुषीत पाण्याचाच पुरवठा केला जात आहे. तिन महिन्यांपासून सुरू असलेल्या दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याचे नमुणे ग्रामीण पाणीपुरवठा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. खारेपाट परिसरात एकूण १२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायती व तेथील सरपंचांनी या समस्येविषयी सिडको, संबंधीत विभाग व राज्य शासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. दुषीत पाण्याच्या अहवालाच्या प्रतीही पाठविल्या आहेत. पंरतू एकही अस्थापनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सिडकोने त्यांनी विकसीत केलेल्या नोडमधील नागरिकांसाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. परंतू ज्यांच्या जमीनीवर धरण बांधले त्या नागरिकांसाठी मात्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवरही तक्रारी केल्या आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने दुषीत पाणीच प्यावे लागत आहे. या पाण्याचा आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पाणी उकळून पिण्यास सुरवात केली आहे. आहे.