शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सिडकोच्या हेटवणे धरणातून दूषित पाणीपुरवठा

By admin | Published: November 07, 2015 11:33 PM

सिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा

- दत्ता म्हात्रे,  पेणसिडकोने बांधलेल्या हेटवणे धरणातून पेण तालुक्यातील ८४ गावांना तिन महिन्यांपापासून दुषीत पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात पुरवठा होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. सर्व ग्रामपंचायतीने याविषयी तक्रारी करूनही व मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केल्यानंतरही शासनाने अद्याप या समस्येचे दखल घेतलेली नसून या ६० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे भिषण दुष्काळ पडला आहे. अनेक परिसरामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिवाळीच्या अगोदरपासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणचे पाणी दुषीत असल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी दिला असतानाही नागरिकांना पर्याय नसल्याने तेच पाणी प्यावे लागत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधील खारीपाट परिसरातील ८४ गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. याच या धरणातून पनवेल तालुक्यातील सिडको नोडमध्येही पाणीपुरवठा केला जात आहे. परंतू सिडकोने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून ते नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहे. परंतू ज्या परिसरात हे धरण आहे तेथील नागरिकांना मात्र प्रक्रिया न केलेले दुषीत पाण्याचाच पुरवठा केला जात आहे. तिन महिन्यांपासून सुरू असलेल्या दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्याचे नमुणे ग्रामीण पाणीपुरवठा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा स्पष्ट अहवाल दिला आहे. खारेपाट परिसरात एकूण १२ ग्रामपंचायती आहेत. सर्व ग्रामपंचायती व तेथील सरपंचांनी या समस्येविषयी सिडको, संबंधीत विभाग व राज्य शासनाकडेही तक्रारी केल्या आहेत. दुषीत पाण्याच्या अहवालाच्या प्रतीही पाठविल्या आहेत. पंरतू एकही अस्थापनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सिडकोने त्यांनी विकसीत केलेल्या नोडमधील नागरिकांसाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधले आहे. परंतू ज्यांच्या जमीनीवर धरण बांधले त्या नागरिकांसाठी मात्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवरही तक्रारी केल्या आहेत. परंतू मुख्यमंत्र्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजाने दुषीत पाणीच प्यावे लागत आहे. या पाण्याचा आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पाणी उकळून पिण्यास सुरवात केली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी फिल्टरचा उपयोग सुरू केला आहे. परंतू यामुळे समस्या संपलेली नाही. शासनाने योग्य उपाययोजना केली नाही तर या परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.मुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष ८४ गावांमधील ग्रामस्थांनी शासनस्तरावर अनेक तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी विशेष पोर्टल तयार केले आहे. सदर पोर्टलवरही नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु मुख्यमंत्रीही या समस्येकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतींचा पाठपुरावा : तिन महिन्यांपासून नागरिकांना दुषीत पाणीपुरवठा होत आहे. सर्वच ग्रामपंचायतीच्या संरपंचांनी याविषयी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. हेटवणे धरणातून पनवेल परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्याचधर्तीवर जलशुद्धीकरण केंद्र या परिसरातील नागरिकांसाठी उभे करण्याची मागणी केली आहे.