मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित - पी.वेलरासू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:45 AM2024-07-02T00:45:40+5:302024-07-02T00:46:50+5:30

जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

Jagannath Motiram Abhyankar was declared the winner in the Mumbai Teachers Constituency by getting 4 thousand 83 votes says P. Velrasu | मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित - पी.वेलरासू

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी घोषित - पी.वेलरासू

नवी मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  11 हजार 598  मते वैध ठरली तर 402  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी   5 हजार 800   इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. 

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83  मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.  
 

Web Title: Jagannath Motiram Abhyankar was declared the winner in the Mumbai Teachers Constituency by getting 4 thousand 83 votes says P. Velrasu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.