शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

जय जय महाराष्ट्र माझा

By admin | Published: May 02, 2017 3:38 AM

शहरात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : शहरात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शानदार संचलन, उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार, व्याख्यानमाला, थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण तसेच शाळा व महाविद्यालयाच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी बोलताना शहराचा नावलौकिक देशभरात असून हा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येकाने अधिक चांगले काम करण्याचा दृढ निश्चय करायला हवा, असे प्रतिपादन महापौर सोनवणे यांनी केले. सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारीवृंदाने सामूहिकरीत्या स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयास ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून ती बघण्यासाठी व महापालिका मुख्यालयाच्या आवारातील २२५ फूट उंच प्रतीकात्मक राष्ट्रध्वजासमवेत रोषणाईसह आपले सेल्फी छायाचित्र काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणशहरातील शाळा, महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शालेय वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना थोर पुरुष, हुतात्म्यांविषयी माहिती देत महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाळा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत, देश स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्या थोर पुरुषांविषयी भाषण सादर केले. बेलापूरमधील विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण करून सामूहिक श्रद्धांजली वाहिली. तर, स्काऊट गाइड, एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनातून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कोकण भवन येथे कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या वेळी उपआयुक्त शिवाजी कादबाने, रवींद्र शिंदे, बापूसाहेब सबनीस, अरुण अभंग आदी उपस्थित होते. कळंबोली पोलीस मुख्यालयात आवारात महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झालेल्या १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, भीमराव बिनवडे, सहायक निरीक्षकांमध्ये मारुती नाईकडे, सहायक उपनिरीक्षक मनोज वायंगणकर, काशिनाथ राऊत, पांडुरंग निघोट, हवालदार विनोद नवले, संजय कदम, विकास साळवी, जितेंद्र गोसावी, सुदाम पाटील, विजय निवळे, राजेश शिर्के, समीर पाटील, जगदीश पाटील, विनायक निकम यांचा समावेश होता. सफाई कामगारांचा सन्मानमुख्यालयातील सुरेश पातरोट, रंजना मंजाळ, नेरूळ विभागातील संदीप पाटील, तुर्भे विभागातील दीप्ती गांगण, कोपरखैरणे विभागातील कमलाकर म्हात्रे, ऐरोली विभागातील कमलाकर मढवी या सफाई कामगारांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार आदी उपस्थित होते.भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने शहरातील महानगरपालिका रुग्णालय आणि सभोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील सफाई कामगारांमध्ये गुलाबाची फुले तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. सफाई कामगारांमुळे स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहराचे नाव अव्वल ठरत आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, सचिव प्रदीप बुरकुल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम राबविण्यात आली.