मधुकर ठाकूर
उरण : अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मजबूत लॉजिस्टिक इकोसिस्टम आणि प्रमुख बाजारपेठांशी जवळीक यामुळे जेएनपीए सेझने शिपिंग उद्योगात क्रांती केली असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष संजय सेठी यांनी केले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री'च्या (सीआयआय ) संयुक्त विद्यमाने आयोजित स्पेशल इकॉनॉमिक झोन गुंतवणूकदार कॉन्क्लेव्हची सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना सेठी यांनी सेझ गुंतवणूकदारांच्या कॉन्क्लेव्हद्वारे निर्माण झालेल्या गतीचा फायदा घेण्यासाठी व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र म्हणून स्थान मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या अनुषंगाने व्यवसायांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकास सुलभ करण्यासाठी हे बंदर वचनबद्ध असल्याची ग्वाहीही सेठी यांनी यावेळी गुंतवणूकदारांना दिली.गुंतवणूकदार कॉन्क्लेव्हने विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या अफाट गुंतवणुकीच्या संधींचे प्रदर्शन करणे आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सहकार्य वाढवणे हे उद्दिष्ट ठेवले होते. या कार्यक्रमाने सहभागींना फलदायी चर्चा करण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या संभाव्य भागीदारी शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचेही सेठी यांनी सांगितले.
कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेल्या भागधारकांची कृतज्ञता व्यक्त केली की त्यांनी कॉन्क्लेव्ह यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सहयोग आणि भागीदारीच्या महत्त्वावर भर दिला तसेच या क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या कार्यक्रमाचे स्वागत करतानाच “गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. यावरूनच त्यांचा जेएनपीए सेझवरील विश्वास दिसून येतो जो गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सेठी म्हणाले.
या कॉन्क्लेव्हमध्ये नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, औद्योगिक संघटना, सरकारी अधिकारी, लॉजिस्टिक,उद्योग नेते, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रमुख भागधारक, पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथी उपस्थित होते.