जेएनपीटीतील क्रेनला आग, लाखोंचे नुकसान : कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेन खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:28 AM2017-09-09T03:28:57+5:302017-09-09T03:29:01+5:30
जेएनपीटीच्या कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेनला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीत जेएनपीटीच्या क्रेन्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
उरण : जेएनपीटीच्या कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेनला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीत जेएनपीटीच्या क्रेन्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने आग आटोक्यात आणण्यास यश आले, अन्यथा बाजूलाच असलेल्या हजरडस्टने भरलेल्या कंटेनर साठ्याला आग लागली असती तर अनर्थ घडला असता, अशी माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी दिली.
जेएनपीटी बंदरात कंटेनर हाताळणी करणाºया आरटीजीसी १ क्रेनचे काम सुरू होते. जनरल शिपमध्ये आग लागण्याच्या तासाभरापूर्वी या आरटीजीसी १ क्रेनचे एका तासातच ३० कंटेनर हाताळणी केली होती. कंटेनर हाताळणी केली होती. कंटेनर हाताळणीचे काम सुरू असतानाच सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास क्रेनच्या मोटारीच्या भागात आग लागली. वायरीने पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ वरिष्ठांना वर्दी देवून जेएनपीटी विभागाच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
जेएनपीटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून अर्धा तासाभरातच आग काबूत आणली. मात्र आगीमुळे क्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किमती मोटार आणि के बिनही जळाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता जेएनपीटी अधिकाºयांनी व्यक्त केली असून क्रेनचा विमा असल्याने त्याची आर्थिक भरपाई तत्काळ मिळणार असल्याची माहितीही जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.
क्रेनचे नादुरुस्त स्पेअर पार्ट्स तत्काळ बदलण्यात येवून दोन दिवसांतच कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याचे जेएनपीटी अधिकाºयांनी माहिती देताना सांगितले.