जेएनपीटीने केली महाकाय कार्गोची हाताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:05 AM2019-02-01T01:05:28+5:302019-02-01T01:05:30+5:30
पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने उपकरणे शॅलो वॉटर बर्थवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम.व्ही.हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरीत्या लोड केली.
उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने निर्यातीसाठी आलेल्या महाकाय प्रोजेक्ट कार्गोची यशस्वीरीत्या हाताळणी केली. ही अवजड यंत्रसामुग्री आफ्रिकेतील जीनिया या देशातील खाण विकास आणि निर्यात सुविधांसाठी बार्ज लोडिंग मशिनची सब-असेंब्ली होती. पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने ही उपकरणे शॅलो वॉटर बर्थवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम.व्ही.हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरीत्या लोड केली.
१,११५ मेट्रिक टन माल व १३२ पॅकेजेस असलेल्या या अवजड कार्गो (मुख्य बूम-शटल बूम असेंब्ली)ची लांबी ६२ मीटर्स व वजन ३८४ टन होते. या संपूर्ण प्रयोगाद्वारे मेक इन इंडियासाठी जेएनपीटीचे योगदान दिसून आले. या प्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, अशा महाकाय अवजड कार्गोच्या यशस्वी लोडिंगसाठी उच्च दर्जाचे कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते, जे आमच्या पोर्ट अधिकाºयांनी दाखवून दिले. अशा कठीण प्रसंगात बंदराची कार्यक्षमता व सर्व विभागांची एकजूट पूर्णपणे दिसून येते. कारण अगदी लहान त्रुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. मला माझ्या टीमचा अभिमान असून, अशा प्रकारच्या कामगिरीने जेएनपीटी देशातील सर्वोत्तम कंटेनर पोर्ट तसेच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पोर्ट पैकी एक असल्याचे सिद्ध होते. ही माल हाताळणी मेसर्स शापुरजी पालोनजी कंपनी प्राइव्हेट लिमिटेडच्या आंतरराष्ट्रीय ईपीसी कॉन्ट्रॅक्टचा भाग होती व जे. एम. बक्षी हे जहाजाचे एजंट होते.