जेएनपीटीच्या अधिका-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:54 AM2017-08-18T05:54:03+5:302017-08-18T05:54:03+5:30

JNPT officials beat up | जेएनपीटीच्या अधिका-यांना मारहाण

जेएनपीटीच्या अधिका-यांना मारहाण

Next

उरण (रायगड) : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रा. लि. (सिंगापूर पोर्ट), जेएनपीटी आणि सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात नुकतीच संयुक्त बैठक झाली होती. या वेळी प्रकल्प अधिकाºयांना समितीच्या नेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक प्रशांत पाटील यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
या निंदनीय प्रकाराचा सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक माईक फार्मोसी आणि जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर यांनी जाहीर निषेध केला आहे. यापुढे प्रकल्प अधिकाºयांसोबत प्रकल्पग्रस्तांच्या समितीकडून केलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जेएनपीटी बंदरांतर्गत उभारल्या जाणाºया सर्वात मोठ्या ‘सिंगापूर पोर्ट’मध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी समितीची मागणी आहे. या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी आणि सिंगापूर पोर्ट यांच्यात सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यानच्या काळात सिंगापूर पोर्ट अधिकाºयांनी ४० परप्रांतीय कामगारांची भरती केली. यामुळे प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांच्यातील वाद चिघळला. यावर तोडगा काढण्यासाठी १० आॅगस्ट रोजी जेएनपीटी आणि सर्वपक्षीय जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात संयुक्त बैठक बोलावली होती. जेएनपीटी, सिंगापूर पोर्टचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपावगळता समितीचे अन्य सदस्य, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. समितीचे निमंत्रक तथा राष्टÑवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी प्रकल्प अधिकारी सुरेश आमीर आप्पो, दत्ताजी जगताप आणि इतर उपस्थित अधिकाºयांना शिवीगाळ केली. तसेच प्रकल्प अधिकाºयांना मारहाण करीत दिलेल्या धमक्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिसात जेएनपीटी अधिकारी एन. के. कुलकर्णी यांनी तक्रार केली होती.
>संयुक्त निवेदनाद्वारे इशारा
डिसेंबरअखेरीस कार्यान्वित होणाºया देशातील सर्वाधिक लांबीच्या अत्याधुनिक बंदराच्या कोणत्याही कामात भविष्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करतानाच यापुढे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जेएनपीटी आणि सिंगापूर पोर्ट यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: JNPT officials beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.