सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील,

By नारायण जाधव | Published: December 2, 2022 10:22 PM2022-12-02T22:22:51+5:302022-12-02T22:23:13+5:30

सीमा शुल्क विभागाची कारवाई.

jnpt seal of 2 5 crores earpods Customs department s action crime news | सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील,

सांगितले इअरबर्ड्स पण निघाले एअरपॉड्स, जेएनपीटीत अडीच कोटींचा ऐवज सील,

Next

नवी मुंबई : येथील जेएनपीटी बंदरातील तस्करी थांबायचे नाव घेत नसून बुधवारी सीमा शुल्क विभागाने एका कंटेनरमधून झाडू, ब्रश आणण्याच्या नावाखाली ई-सिगारेट्स, ई-सिगारेट्सच्या रीफिल, खेळण्यांसह ब्रँडेड सौंदर्यसाधने अशी तीन कोटींची तस्करी उघड केली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारीही ऑटाेमोबाइल पार्ट्स आणि इअर बर्ड्सच्या नावाखाली अडीच कोटी रुपये किमतीच्या एअरपॉड्स, एलईडी लॅम्पची तस्करी उघड केली आहे. हा सर्व मुद्देमाल सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सील केला आहे.

एका ४० फुटी कंटेनरमधून हा माल आणण्यात आला होता. त्यात ऑटोमोबाइल पार्ट्स, स्टेशनरी आणि इअर बर्ड्स असा साडेचौदा लाख रुपयांचा ऐवज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत त्यात १४ हजार नग एअरपाॅड, एलईडी लॅम्प आढळले असून त्यावर बीआयएस मार्किंग नव्हते.

या मालाची किमत अडीच कोटी रुपये असल्याचे न्हावा-शेवा विभागाच्या सीमा शुल्क विभागाने सोशल मीडियावर ट्वीट करून सांगितले आहे. हा माल कोठून आणला होता, कोणी आणला होता, याबाबतचा सखोल तपास सुरू आहे.

Web Title: jnpt seal of 2 5 crores earpods Customs department s action crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.