जेएनपीटीची तीन महिन्यांत २७ टक्के घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:27 AM2018-07-19T02:27:53+5:302018-07-19T02:28:06+5:30

एकीकडे जेएनपीटीअंतर्गत असलेली खासगी बंदरे कंटेनर मालाच्या हाताळणीत वरचढ ठरत असताना मात्र मागील तीन महिन्यांत जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदरातील कंटेनरची वाहतूक २७ टक्क्यांनी घसरली आहे.

 JNPT slips 27% in three months | जेएनपीटीची तीन महिन्यांत २७ टक्के घसरण

जेएनपीटीची तीन महिन्यांत २७ टक्के घसरण

Next

उरण : एकीकडे जेएनपीटीअंतर्गत असलेली खासगी बंदरे कंटेनर मालाच्या हाताळणीत वरचढ ठरत असताना मात्र मागील तीन महिन्यांत जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदरातील कंटेनरची वाहतूक २७ टक्क्यांनी घसरली आहे.
कामगारांना पुरेसे वेतन, भरमसाठ ओव्हर टाइम आदी सुविधा देऊनही जेएनपीटीची कंटेनर वाहतुकीत प्रचंड प्रमाणात घसरण होत आहे.त्यामुळे व्यवस्थापनासह केंद्रातील शिपिंंग मंत्रालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून जेएनपीटीतील आॅपेरशन विभागातील एक शिफ्ट ठेकेदारी पद्धतीवर चालविण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपली आहे. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (१९) जेएनपीटी व्यवस्थापनाने तातडीची बैठक बोलावली असून यासाठी जेएनपीटीच्या मान्यताप्राप्त तीनही कामगार संघटनांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, कामगार संघटनाही जेएनपीटी प्रशासनाच्या कामगारविरोधी धोरणामुळे पेटून उठल्याने गुरुवारी (१९) रोजी होणारी बैठक वादळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वर्षाकाठी १४०० कोटींचा नफा कमाविणाऱ्या जेएनपीटीची कंटेनर हाताळणीची क्षमता मागील वर्षापासून चांगली घसरली आहे. मागील आर्थिक वर्षात जेएनपीटीची कंटेनर हाताळणीची क्षमता ९.४५ टक्क्यांनी घसरली आहे. त्यात आता एप्रिल ते जून २०१८ या तीन महिन्यांतच जेएनपीटीची कंटेनर हाताळणीची क्षमता २७ टक्क्यांनी घसरली आहे. जेएनपीटीअंतर्गत असलेल्या खासगी बंदरातून कंटेनर हाताळणीची क्षमता दिवसागणिक वाढत चालली आहे.प्रत्येक मालवाहू जहाजाला बर्थ मिळण्यास ४० तासांचा विलंब होत आहे. जेएनपीटीच्या क्रेनची मोव्हिंगची अ‍ॅव्हरेज क्षमता प्रतितास १४.७४ पर्यंत घसरली असताना खासगी बंदरातील क्रेनची मोव्हिंगची अ‍ॅव्हरेज क्षमता एनएसआयसीटी-२२ प्रतितास, बीएमसीटी-२७.४६ प्रतितास, जीटीआय २९.२८ प्रतितास अशी वाढली आहे. बर्थ प्रोडक्टीवीटी अ‍ॅव्हरेज क्षमता जेएनपीसीटी - ५६ मोव्हज प्रतितास इतकी घसरली असताना मात्र खासगी बंदरांच्या बर्थ प्रोडक्टीवीटी अ‍ॅव्हरेजची क्षमता जीटीआय ९२.९२ मोव्हज प्रतितास, एनएसआयसीटी ९२.१२ मोव्हज प्रतितास इतकी वाढली आहे. जेएनपीसीटी प्रत्येक महिन्याकाठी कार्गोची वाहतूूकही चांगली थंडावली आहे. जेएनपीटी प्रत्येक शिफ्टच्या प्रत्येक कामगाराला चार तासांच्या ओव्हरटाइमपोटी महिन्याला ५४ हजार ४३२ रुपये अदा करते. त्याशिवाय कामगारांना अन्य सुविधा पुरविण्यात येत असल्याचे व्यवस्थापनाने पत्रात म्हटले आहे. असे असतानाही जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराच्या (जेएनपीसीटी) घसरली आहे. जेएनपीसीटीच्या घसरत्या डोलाºयामुळे व्यवस्थापनात चिंतेचे वातावरण आहे. जेएनपीटीच्या वाढत्या घसरणीमुळे बंदरात व्यवसाय करणाºया अनेक शिपिंग कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. घसरण रोखण्यासाठी आॅपरेशन विभागाची एका शिफ्ट ठेकेदारीवर अर्थात खासगीकरणातून चालण्याच्या निर्णयाप्रत जेएनपीटी पोहचली आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी जेएनपीटी व्यवस्थापनाने तातडीने बैठक बोलावली आहे. गुरुवारी (१९) बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनांना आमंत्रित केले आहे.
>कामगार संतप्त
जेएनपीटीच्या कामगार विरोधी धोरणाविरोधाचा निषेध
बैठक वादळी ठरण्याची
शक्यता

Web Title:  JNPT slips 27% in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.