जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:01 AM2019-06-29T02:01:55+5:302019-06-29T02:02:06+5:30

देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अ‍ॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे.

JNPT's Best Port Award, Noteworthy work done at all levels | जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम

जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम

Next

उरण : देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अ‍ॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे.
या प्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार जागतिक दर्जा प्राप्त करणे आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करण्याच्या आमच्या अथक प्रयत्नांना प्रोत्साहन देणारा आहे. गेल्या तीन दशकांत जेएनपीटीने जागतिक पातळीवर सर्वोत्तम ३० कंटेनर पोटर््समध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने परिचालन क्षमता आणि पोर्ट क्षमतेमध्ये पद्धतशीर विकास केला आहे. आम्ही आमच्या सेवेची क्षमता वाढवीत असून चालू असलेल्या उपक्रमांद्वारे पोर्टमध्ये नवीन परिवर्तन घडून प्रगतीला चालना मिळेल. तसेच भारतीय समुद्र क्षेत्राची यशस्वी होण्याच्या नवीन दिशेने वाटचाल सुरू होईल, असे सांगितले.
बेस्ट पोर्ट आॅफ द इयर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, कार्गो हाताळणी, उपकरणे हाताळणी, ई-बिझिनेस आणि ग्राहक समाधानासारख्या विविध स्तरांचे मूल्यांकन केले जाते.
जेएनपीटने या सर्व स्तरावर उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. तसेच अनेक
योजना हाती घेण्यात आल्या असून,
ज्यामध्ये चौथ्या टर्मिनलचा विकास, मेगा रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट
प्रोजेक्ट, ड्रेजिंग, नॅव्हिगेशनल चॅनेल, ड्राय पोटर््स, जेएनपीटी-एसएसझेड प्रकल्प, आॅटोमेशन आणि डिजिटायझेशन सुविधा यासारख्या अनेक प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून पोर्टचे विस्तारीकरण आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
 

Web Title: JNPT's Best Port Award, Noteworthy work done at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.