शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बनावट मार्कशिटद्वारे घेतली नोकरीत बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:33 PM

सिडकोतील प्रकार; गुन्हा दाखल

नवी मुंबई : सिडको कर्मचाऱ्याने बनावट मार्कशिट सादर करून नोकरीत बढती घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील सहा वर्षांपासून तो बढतीच्या नोकरीचा लाभ घेत होता.राजेश अनंत पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. १९९७ साली तो सिडकोत सुरक्षारक्षक पदावर नोकरीला लागला होता. या नोकरीकरिता त्याने दहावी नापास असल्याचे गुणपत्रक सादर केले होते; परंतु २००९ मध्ये त्याने नोकरीत बढतीसाठी अर्ज करून दहावी व बारावी उत्तीर्ण असल्याचे शिक्षण मंडळाचे गुणपत्रक जोडले होते. त्याद्वारे २०१४ मध्ये त्याने नोकरीत बढती मिळवून लिपिक या पदाचा कार्यभार स्वीकारला होता; परंतु त्याने सादर केलेले गुणपत्रक बनावट असल्याची माहिती सिडकोला प्राप्त झाली होती. त्यानुसार सहायक विकास अधिकाºयामार्फत त्याच्या कागदपत्रांची चौकशी सुरू होती. यामध्ये राजेश पाटील याने बढतीसाठी सादर केलेले दोन्ही मार्कशिट बनावट असल्याचे आढळून आले. त्यासंबंधीचा अहवाल सिडकोमार्फत गुन्हे शाखा पोलिसांकडे सादर करण्यात आला होता. त्याद्वारे सीबीडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :cidcoसिडको