सानपाड्यात ‘जोडी तुझी नि माझी’, उलगडणार नाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:26 AM2017-11-08T02:26:27+5:302017-11-08T02:26:32+5:30
आधुनिक जीवनशैली, धावपळ आणि घड्याळाच्या काट्यांनुसार चालणाºया आयुष्यात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. लोकमत सखी मंच आणि तन-मन कलेक्शनच्या वतीने
नवी मुंबई : आधुनिक जीवनशैली, धावपळ आणि घड्याळाच्या काट्यांनुसार चालणाºया आयुष्यात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. लोकमत सखी मंच आणि तन-मन कलेक्शनच्या वतीने ‘जोडी तुझी माझी’ (बंध सखींचे, बंध आपुलकीचे) या उपक्रमातंर्गत नाती आणखी घट्ट करण्याची सुवर्णसंधी सखींना मिळणार आहे. शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत सानपाडा सेक्टर १० येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, प्लॉट नंबर ४२, लेडीज हॉस्टेलसमोर, डीमार्टच्या मागे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला नवी मुंबई जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात फॅशन शो ही पहिली स्पर्धा होणार असून, रेट्रो लूक म्हणजेच जुन्या काळातील अभिनेत्रींनी परिधान केलेला पोशाख या संकल्पनेवर आधारित असणार आहे. त्यानंतर ‘जोडी तुझी माझी’ या दुसºया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्राथमिक फेरीत एकमेकींची ओळख, दुसरी कलाविष्कार फेरी, तृतीय प्रश्नोत्तर फेरी अशा तीनही यशस्वीपणे पार पडणाºया जोडीची निवड केली जाणार आहे. यामध्ये सासू-सून, दोन मैत्रिणी, नणंद-भावजय, जाऊबाई अशा जोड्या असतील. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.