शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पनवेलच्या आगामी महापौरपदासाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 1:48 AM

डॉ. कविता चौतमोल यांचा कार्यकाळ संपुष्टात : खुल्या वर्गातील नगरसेविकेला मिळणार संधी

वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महिला खुल्या वर्गासाठी राखीव असल्याने भाजपमधील खुल्या वर्गातील महिला नागरसेविकांना महापौरपदाची संधी चालून आली आहे. चौतमोल यांच्या रूपाने पनवेलला सुशिक्षित महिला महापौर मिळाले होते. पुन्हा एकदा महिलेसाठीच महापौरपदाची जागा आरक्षित झाल्याने या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असलेला खारघर नोडमधून भाजपला मतदारांनी भरभरून दिले आहे. त्यादृष्टीने पालिकेचा शहरी भाग असलेल्या खारघर शहराला महापौरपदाचे नेतृत्व मिळावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. महिला खुल्या वर्गासाठी सर्वात जास्त खारघरमधूनच उमेदवार आहेत. त्यामुळे आगामी महापौरपदासाठी भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांच्यासह नगरसेविका नेत्रा पाटील, संजना कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. येत्या जानेवारी महिन्यात महापौरपदाची निवडणूक पडणार आहे. महापौरपदासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे नाव पहिल्यापासून चर्चेत होते. मात्र, दोन्ही वेळेला महिला प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव झाल्याने ठाकूरांची संधी हुकली. पनवेलसारख्या ऐतिहासिक शहराचे महापौरपद भूषविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, महापौरपदी सुशिक्षित उमेदवाराची निवड व्हावी, अशीदेखील नागरिकांची मागणी आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने भाजपचे वरिष्ठ नेतेदेखील महापौर निवडीकडे गांभीर्याने पाहण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृहनेते परेश ठाकूर हे महापौर निवडीची अंतिम चर्चा करूनच तसा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठविणार आहेत. दरम्यान, अद्यापपर्यंत याबाबत भाजप गोटात उघडपणे कोणत्याही उमेदवाराच्या नावाची चर्चा नसली तरी महिला नगरसेविका त्यांचे पती आपल्या परीने या पदासाठी लॉबिंग करीत असल्याचे दिसून येत आहे.पनवेल शहरानंतर खारघरला संधी?च्खारघर शहरातून १२ पैकी १२ नगरसेवक भाजपचे निवडून दिल्याने महापौरपदाची संधी खारघर शहराला मिळावी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. खारघरसारख्या शहरी भागातील नगरसेविकेला महापौरपदाची संधी मिळाल्यास खारघरमध्ये भाजपची ताकद आणखीन वाढणार आहे. त्या दृष्टीनेही पक्षनेतृत्वाने विचार केल्यास खारघरला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या महिला मोर्चा व खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांचे नाव आघाडीवर आहे.सुशिक्षित उमेदवाराला संधीची गरजच्पनवेल शहराची वाटचाल मेट्रोपॉलिटन शहराकडे होत चालली आहे. त्या दृष्टीने सुशिक्षित चेहरा भाजपने दिल्यास त्याचा फायदा भविष्यात भाजपला होणार आहे. पनवेलच्या प्रथम महापौरपदी सुशिक्षित पेशाने डॉक्टर यांची वर्णी लागल्याने पनवेलकरांनी या निर्णयाचे स्वागत केले. याच धर्तीवर सुशिक्षित उमेदवाराला पुन्हा भाजप संधी देईल का? हेदेखील महिनाभरात स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल