कौटुंबिक वादातून काकाने केली ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

By admin | Published: July 3, 2015 11:45 AM2015-07-03T11:45:09+5:302015-07-03T11:48:22+5:30

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फ्रान्सिला वाझ या आठ वर्षाच्या चिमुरडीची तिच्या काकानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे.

Kakne murder case: 8 year old Kidney murder case | कौटुंबिक वादातून काकाने केली ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

कौटुंबिक वादातून काकाने केली ८ वर्षाच्या चिमुरडीची हत्या

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी मुंबई, दि. ३ - गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फ्रान्सिला वाझ या आठ वर्षाच्या चिमुरडीची तिच्या काकानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरारोड परिसरात फ्रान्सिलाचा मृतदेह आढळला असून याप्रकरणी पोलिसांनी फ्रान्सिलाचा काका  क्लेरेन्सला अटक केली आहे. 
नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारी फ्रान्सिला सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाली होती. फ्रान्सिलाला तिच्या शाळेची बस इमारतीच्या गेटपर्यंत सोडायची. सोमवारी संध्याकाळी फ्रान्सिला नेहमीप्रमाणे बसमधून इमारतीच्या गेटपर्यंत आली होती. मात्र गेटजवळूनच ती गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. फ्रान्सिलाचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना होता. फ्रान्सिला बेपत्ता झाल्यापासून तिची मावशी एकदाच त्यांच्या घरी आली होती. तर तिचा पतीही काही वेळेसाठीच त्यांच्या घरी आला. त्यामुळे पोलिसांचा फ्रान्सिलाचे काका क्लेरेन्सवर संशय बळावला. गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी क्लेरेन्स यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता क्लेरेन्सने गुन्ह्याची कबूल दिल्याचे अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली. क्लेरेन्सने सोमवारी इमारतीच्या गेटपासून फ्रान्सिलाचे अपहरण केले, यानंतर तिला मीरारोड येथील निर्जनस्थळी नेत गळा आवळून तिची हत्या केली. पोलिसांनी मीरारोडमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिच्या शरीरावर जखमा आढळल्या असून तिच्यावर अत्याचार झाला आहे का हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. क्लेरेन्स व फ्रान्सिलाच्या वडिलांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

Web Title: Kakne murder case: 8 year old Kidney murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.