कळंबोली मुख्यालय : महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:00 AM2018-05-02T04:00:44+5:302018-05-02T04:00:44+5:30
महाराष्ट्र दिनाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते
पनवेल : महाराष्ट्र दिनाच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या वेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, नवी मुंबई प्रशांत बुरुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई पोलीस वाहतूक शाखा पथक, सिडको अग्निशमन दल पथक, नवी मुंबई पोलीस बॅण्ड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, नवी मुंबई पोलीस श्वान पथक, बुलेट प्रूफ वाहन, आर.आय.व्ही. वाहन, वज्र वाहन, बीडीडीएस वाहन, वरुण वाहन, अग्निशमन दल वाहन आदीनी संचलनाद्वारे प्रमुख अतिथी विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. रस्ता सुरक्षा पंधरवडानिमित्त पी.डी.सी, डान्स अॅकॅडमी, नवी मुंबई यांनी पथनाट्य सादर केले. या वेळी उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी शुभांगी पाटील व निंबाजी गीते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्र मास उपआयुक्त (सामान्य प्रशासन) महेंद्र वारभुवन,उपायुक्त (महसूल) सिद्धराम सालीमठ, उपायुक्त (करमणूक) शिवाजी कादबाने, उपायुक्त (विकास) गणेश चौधरी, उपायुक्त (पुरवठा) दिलीप गुट्टे, उपायुक्त (रोहयो) अशोक पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, पोलीस उपायुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, पोलीस उपायुक्त नितीन पवार तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले. पनवेल महानगरपालिका, तहसील कार्यालयातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
महासंचालक सन्मानचिन्हाने गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी मुंबई आयुक्तालयातील दहा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यंदाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यामध्ये गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस दलात कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाºया अधिकारी तसेच कर्मचारी यांना प्रतिवर्षी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने पुरस्कृत केले जाते. त्यानुसार यंदा राज्यातील ५७१ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना हे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. त्यात नवी मुंबई आयुक्तालयातील दहा अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी, वरिष्ठ निरीक्षक विनोद चव्हाण, चंद्रकांत काटकर, जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन गायकवाड, मच्छिंद्र खाडे, सहायक निरीक्षक उल्हास कदम, प्रदीप सरफरे, सहायक उपनिरीक्षक जालंदर कदम, हवालदार सुभाष पानसरे यांचा समावेश आहे. सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी सहआयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त आर. आर. बनसोडे, प्रवीण पवार, सुधाकर पठारे, राजेंद्र माने, नितीन पवार आदी उपस्थित होते.