कळंबोली-उरण एनएमएमटी ठरतेय डोकेदुखी

By Admin | Published: June 18, 2017 02:05 AM2017-06-18T02:05:06+5:302017-06-18T02:05:06+5:30

कळंबोलीवरून उरणकडे जाणाऱ्या एनएमएमटी बसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या ही बससेवा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक तक्रारी करूनदेखील

Kalamboli-Uran NMMT decides headache | कळंबोली-उरण एनएमएमटी ठरतेय डोकेदुखी

कळंबोली-उरण एनएमएमटी ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कळंबोलीवरून उरणकडे जाणाऱ्या एनएमएमटी बसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सध्या ही बससेवा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक तक्रारी करूनदेखील एनएमएमटी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कळंबोली ते महामार्गावर ३० क्रमांकाची एनएमएमटी बस धावते. खारघर मार्गे, सीबीडी बेलापूर त्यानंतर उलवा नोडमधून ही बस उरणकडे प्रस्थान करते. या मार्गावर एमएमएमटीच्या जुन्या व तकलादू बस चालविल्या जात असल्याची तक्रार खारघरमधील रहिवासी पांडुरंग शिरसकर यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दर ३० मिनिटांना या मार्गावर ही बस धावते. मात्र, मोडकळीस आलेल्या बसमुळे ती अनेकदा नादुरुस्त होते. त्यामुळे प्रवाशांना कधीच वेळेवर कामावर पोहोचता येत नाही.

बस स्थिती आणि सेवा सुधारण्याची गरज
कळंबोली ते उरण दरम्यान बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एनएमएमटी प्रशासनाकडून अत्याधुनिक सेवा देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बसमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिका प्रशासनाने बसची स्थिती आणि सेवा सुधारण्याची गरज असल्याचे शिरसकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kalamboli-Uran NMMT decides headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.