कामोठे खाडी पुलाच्या कठड्यांना तडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:48 AM2017-08-09T06:48:44+5:302017-08-09T06:48:44+5:30

पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Kamoth creek rocks tighten | कामोठे खाडी पुलाच्या कठड्यांना तडे  

कामोठे खाडी पुलाच्या कठड्यांना तडे  

Next

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावरील कामोठे खाडी पुलाच्या संरक्षक कठड्यांना तडे गेले आहेत. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत उपाययोजना करण्याची मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीने केली आहे.
पनवेल-सायन महामार्गावर कोपरा-कामोठे-कळंबोली दरम्यान खाडी आहे. त्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे. महामार्गावर महत्त्वाचा पूल असताना बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नाही. दोन वर्षांपूर्वी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने आता सुसाट वेगाने वाहने मुंबई-पुणे बाजूकडे धावतात. महत्त्वाचा महामार्ग असल्याने वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामध्ये हलक्याबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश असतो.
महामार्गाचे रुंदीकरण करीत असताना पुलाची दुरुस्ती, डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. पूर्वी जे कठडे बांधण्यात आले आहेत ते जीर्ण झाले असून त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत.
विशेष करून मुंबईहून पुण्याकडे जाणाºया मार्गिकेच्या कठड्यांची अवस्था बिकट झाली आहे. दुर्दैवाने एखाद्या वाहनाने धडक दिल्यास, संरक्षण कठडा खाडीत कोसळतील त्याचबरोबर संबंधित वाहनही खाली जाईल, इतके ते जीर्ण झाले
आहेत. एकंदरीतच वाहनांना
अटकाव करण्याची क्षमता त्या कठड्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पनवेल-सायन महामार्ग प्रवासी कृती समितीचे अमोल शितोळे यांनी केली आहे.

पुलाच्या जोडावर भेगा
कामोठे खाडीवर दोन पुलावरील मार्गिका एकमेकांना जोडण्यात आलेल्या आहेत. हा जोड मजबूत नसल्याने वरच्या भागावर भेगा पडलेल्या आहेत. त्या अनेक दिवसांपासून तशाच आहेत. त्याबाबतही सा.बां. विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

Web Title: Kamoth creek rocks tighten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.