कामोठेत रेतीउपसा सुरूच
By admin | Published: August 3, 2015 12:10 AM2015-08-03T00:10:31+5:302015-08-03T00:10:31+5:30
कामोठे परिसरातील रेती बंदरावर पनवेलच्या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकून रेती माफियांचा गोरखधंदा उधळून लावला होता.
तळोजा : कामोठे परिसरातील रेती बंदरावर पनवेलच्या तहसीलदारांनी काही दिवसांपूर्वी छापा टाकून रेती माफियांचा गोरखधंदा उधळून लावला होता. मात्र कारवाईनंतर पुन्हा या ठिकाणी जोरात रेती उत्खनन सुरू झाले आहे.
कामोठे रेती बंदरावर रात्री बारा वाजल्यानंतर रेती माफियांचा धुमाकूळ सुरू असून कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरूनच हे डंपर वाऱ्यासारखे फिरत आहेत, मात्र याचे कुणालाही काहीच पडले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याच बंदरावर तहसीलदार दीपक आकडे यांच्या पथकाने छापा टाकून तीन डंपरसह १० ब्रास वाळू पकडली होती. मात्र आता पुन्हा अवैध रेती उत्खनन सुरू झाले आहे. रेती वाहून नेणारे डंपर चालक कुणालाही जुमानत नाहीत. कोणी आडवा आला तर त्याला चिरडण्यासही ते मागे-पुढे पाहत नाहीत, अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.