नारायण जाधवनवी मुंबई : मुंबई महानगर प्राधिकरणाने प्रस्तावित केलेला बहुप्रतिक्षित कांजुरमार्ग-बदलापूर मेट्रो मार्ग क्रमांक १४ हा नवी मुंबईतील घणसोली-महापे-शीळफाटा मार्गे बदलापूरला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने २०२१ मध्येच तयार केला असून हा मार्ग खासगीकरणातून बांधण्याचे एमएमआरडीएने ठरविले आहे.
मुंबईचे छत्रपती महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. याच जोडीला कांजुरमार्ग ते बदलापूर हा नवा जलद मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. मात्र, निधीची कमतरता असल्याचे सांगून हे दोन्ही महत्त्वकांक्षी प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी किंवा स्वीस चॅलेंज पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत.
कांजुरमार्ग ते बदलापूर मार्ग ४४.७ किमीचाकांजुरमार्ग ते बदलापूर हा मेट्रो मार्ग ४४.७ किमीचा असून त्यावरून २०४१ पर्यंत०.९५ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. तसेच या मार्गामुळे मुंबईची पश्चिम उपनगरे ही बदलापूर परिसरास जोडली जाणार असून त्याचा फायदा त्या भागात आकार घेणाऱ्या पलावासह इतर खासगी टाऊनशिप मधील उत्तुंग निवासी इमारतींसह वाणिज्यिक आस्थापनांना होईल. हा मार्ग पुढे उल्हास मार्गे बदलापूरला पोहचणार आहे.
स्विस कंपन्यांनी दिले आहेत प्रस्तावदोन्ही मेट्रो मार्गाच्या पायाभूत वित्तीय रचनांचा जसे की स्थापत्य कामांचा खर्च प्राधिकरणामार्फत आणि संचलन, देखभाल-दुरुस्ती बाह्य संस्थांकडून करण्याबाबतही अभ्यास सुरू असून केंद्र शासनाच्या मेट्रो धोरणानुसार हे दोन्ही प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. यासाठी M/s.LASANE Infra आणि M/s.Swiss Rapid A.G. Switzerland यासारख्या संस्थानी मॅगलेव्ह रेल्वे प्रणालीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रस्तावही एमएमआरडीएकडे सादर केले आहेत.* स्विस चॅलेंज काय आहे?*आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विस चॅलेंज पद्धती ही एक नव्याने उदयास आलेली निविदा प्रक्रिया आहे. या पद्धतीमध्ये खासगी व्यक्ती किंवा संस्था या स्वत:हून सार्वजनिक निकड असलेले व खासगीकरणातून करता येऊ शकणारे प्रकल्प निवडून स्वत:हून तसा प्रस्ताव शासनास सादर करतात. ही नावीण्यपूर्ण पद्धत भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान राज्यात राबविण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने ती अंगीकारून तसे धोरण १६ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहीर केले आहे. यात प्रथम प्रस्ताव सादर करणाऱ्यास मूळ सूचक असे म्हटले जात असून त्याने सादर केलेल्या प्रस्तावानंतर स्पर्धात्मक निविदा मागविल्या जातात. त्यानंतर किफायतशीर प्रस्ताव देणाऱ्या निविदाकाराने जो प्रस्ताव दिलेला असतो त्यास मिळताजुळता प्रस्ताव सादर करण्याची संधी पुन्हा मूळ सूचकास दिली जाते. ती जर किफायतशीर व स्पर्धात्मक असेल तर त्यास ते काम दिले जाते. मात्र, केंद्रीय सतर्कता आयोगाने या पद्धतीत पारदर्शकता नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही एमएमआरडीए स्वीस चॅलेंज पद्धत सुचविली आहे.मुख्यमंत्र्यांकडून प्रवाशांचा आशावादआता नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील असल्याने ते या मार्गास लवकरच गती देतील,अशी या परिसरातील प्रवाशांना आशा आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या कल्याणचे खासदार असून त्यांच्याच मतदारसंघातून या मार्गाचा बहुतेक विस्तार आहे. यामुळे पितापुत्रांकडून मेट्रो मार्ग १४ ला लवकरच गती मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.