तांबडी येथील मृतदेह कांतीलाल जैन यांचाच

By admin | Published: November 9, 2015 02:45 AM2015-11-09T02:45:26+5:302015-11-09T02:45:26+5:30

तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे

Kantilal Jain, the dead body of Tambadi | तांबडी येथील मृतदेह कांतीलाल जैन यांचाच

तांबडी येथील मृतदेह कांतीलाल जैन यांचाच

Next

रोहा : तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून त्यांचा व्यावसायिक भागीदार जगदीश पृखराज जैन (३३, रा. अलिबाग) याने आॅफिस असिस्टंट मनीषा रामचंद्र चोरढेकर (रा. नांदगाव-मुरु ड) हिच्या मदतीने डोक्यात हातोड्याचा घाव घालून कांतीलाल जैन यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
३० आॅक्टोबर २०१५ ला कांतीलाल जैन सायंकाळी अलिबाग येथून बेपत्ता झाले होते. त्यांची मोटरसायकल संशयास्पद स्थितीत चेंढरे बायपास जवळ आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. १ नोव्हेंबरला रोहा पोलिसांना एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत हनुमान टेकडी परिसरात असल्याची माहिती दुपारी प्राप्त झाली होती. हा मृतदेह सत्तर टक्के जळालेल्या अवस्थेत असल्याने याचा शोध घेणे अतिशय अवघड होते. परंतु मृतदेह जळाल्याच्या ठिकाणी मिळालेला जीन्स पॅन्टचा तुकडा, पट्ट्याचे बक्कल व मृतदेहावरील पांढरे केस याच्या आधारे व सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपी शोधण्यात यश आले

Web Title: Kantilal Jain, the dead body of Tambadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.