कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:04 PM2022-12-01T13:04:38+5:302022-12-01T13:05:33+5:30

कोठिंबे येथे खरेदी केली २५ एकर जमीन

Kapil Dev became a borrower, got a paper from the registrar's office, bought so much land | कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

कागद झाला, कपिल देव बनला 'कर्जत'कर; खरेदी केली एवढी मोठी जमीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : १९९० च्या दशकात उदयास येऊ आलेली कर्जतमधील शेतघराची क्रेझ आजही कायम आहे. क्रिकेटपटू कपिल देव यांनाही कर्जतने भुरळ घातली असून त्यांनी कोठिंबे येथील २५ एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे. बुधवारी ते कर्जतमध्ये दस्त नोंदणीसाठी आले होते. 

प्रदूषणमुक्त वातावरण, निसर्ग संपन्नता, मुंबईपासून जवळ व खळखळ वाहणाऱ्या नद्यांमुळे कर्जत तालुक्याला सेकंड होम म्हणून पसंती दिली जात आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेदेखील कर्जत येथे फार्महाऊस असून त्या काळात काही महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी होत असत. आता साहित्य, कला, क्रीडा, अर्थ, शिक्षण या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनीही कर्जतने भुरळ घातली आहे. 

क्रिकेटपट्टू कपिल देव यांनीही कर्जतच्या या निसर्गाने आकर्षित केले असून त्यांनी तालुक्यातील कोठिंबे भागात २५ एकर जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचे दस्त कपिल देव यांच्याकडून नेरळ येथील सहनिबंधक कार्यालयात बुधवारी नोंदविण्यात आले. यावेळी येथील सन्मान हॉटेल परिसरात त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. 
दुपारी काळ्या रंगाची गाडी नेरळ येथे सहनिबंधक कार्यालयाबाहेर येऊन थांबली. गाडीत कोणीतरी अतिमहत्त्वाची व्यक्ती असावी असा अंदाज येणारे जाणारे व्यक्त करीत होते. 
दरम्यान, त्यांच्या दस्त नोंदणीचा नंबर आला आणि ते गाडीतून उतरताच चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. पंधरा मिनिटांनी ते कसेबसे यातून बाहेर पडत दस्त नोंदणी कार्यालयात गेले. ते बाहेर येईपर्यंत चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

सहनिबंधक कार्यलयात पोहोचल्यानंतर उपनिबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. त्यावेळी त्यांचे वकील ॲड. भूपेश पेमारे, तसेच कार्यालयीन स्टाफ सुनील लगड, मंगेश तिठे, कुणाल दळवी, सारिका गायकवाड, विद्या जाधव यांनी सर्वांनी फोटो काढून घेतले. तर कार्यालयात उपस्थित अनेक वकिलांनाही कपिल देव यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. जेमतेम १५ मिनिटांत ते दस्त नोंदवून निघून गेले.

 

Web Title: Kapil Dev became a borrower, got a paper from the registrar's office, bought so much land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.