कर्जतमध्ये भाजपा स्वबळावर लढणार

By admin | Published: January 11, 2017 06:18 AM2017-01-11T06:18:20+5:302017-01-11T06:18:20+5:30

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी

In Karjat, BJP will fight on its own | कर्जतमध्ये भाजपा स्वबळावर लढणार

कर्जतमध्ये भाजपा स्वबळावर लढणार

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे. पक्षाची वाढती ताकद आणि मतदारांना आजमावण्यासाठी भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविणार आहे, असे मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
कर्जत येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपली भूमिका भाजपातालुका अध्यक्ष दीपक बेहेरे यांनी मांडली. त्यांनी सुरुवातीला शिवसेना आणि भाजपा हे महाराष्ट्रात युतीचे समीकरण जुळले आहे; परंतु कर्जत तालुक्यात आम्ही स्वबळावर लढून पक्षाची ताकद आजमावणार आहोत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी मंगळवारी सकाळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर भाजपाची भूमिका स्वबळावर लढविण्याची असल्याचे तालुकाध्यक्ष बेहेरे यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे जिल्ह्यातील नेते नितीन कांदळगावकर यांनी कर्जत तालुक्यात समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची परवानगी नेतृत्वाकडे मागितली आहे. त्यामुळे तालुक्यात काही भागात ताकद असलेल्या पक्षांबरोबर युती होऊ शकते. त्याच वेळी आमच्या पक्षासोबत अनेक वर्षे असलेल्या आरपीआय आठवले गटालाही त्यांची सोबत येण्याची तयारी असल्यास सामावून घेण्याची तयारी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबरोबर आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कर्जत तालुक्यात युती नसेल, असे स्पष्ट झाले आहे. पनवेल येथील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असल्याचे या वेळी स्पष्ट केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन कांदळगावकर, किसान सेलचे राज्य चिटणीस सुनील गोगटे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, तालुका सरचिटणीस राजेश भगत, अशोक ओसवाल आदी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: In Karjat, BJP will fight on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.