कर्जतमध्ये महिलेला घरात घुसून मारहाण

By Admin | Published: January 24, 2017 05:54 AM2017-01-24T05:54:03+5:302017-01-24T05:54:03+5:30

कर्जत तालुक्यातील कोळीवली येथे महिलेला काही पुरु षांनी घरात घुसून मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार घडला. तक्र ार नोंदविण्यासाठी

In Karjat, a woman was thrashed in the house | कर्जतमध्ये महिलेला घरात घुसून मारहाण

कर्जतमध्ये महिलेला घरात घुसून मारहाण

googlenewsNext

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोळीवली येथे महिलेला काही पुरु षांनी घरात घुसून मारहाण केल्याचा निंदनीय प्रकार घडला. तक्र ार नोंदविण्यासाठी नेरळ पोलिसांकडे गेलेल्या या महिलेची पोलिसांनी उपेक्षा केली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल न करता केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून पोलिसांनी आपली सुटका करून घेतली आहे.
तक्र ारदार यमुना मारु ती भगत या आपल्या कोळिवली येथील भाचा मच्छिंद्र मसने यांच्याकडे गेल्या असता मच्छिंद्र मसने व दत्ता मिसाळ, गोपाळ मिसाळ यांच्यात वहिवाटीवरुन झालेल्या वादाचा रोष ठेवून एका महिलेला शिवीगाळ तर दुसऱ्या महिलेला घरात घुसून मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी दिल. यानंतर संबंधित महिला तक्र ार देण्यासाठी नेरळ पोलीस स्थानकात गेली असता पोलिसांनी या महिलेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत आरोपींवर काहीच कारवाई न करता केवळ अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करून आपले काम अधिक सोपे केले आहे. या माहिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचाराकरिता दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. या महिलेला संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी या आरोपीवर कारवाई करणे अपेक्षीत होते मात्र महिलेच्या तक्र ारीची गांभीर्याने दखल न घेता पोलिसांनी ही तक्र ार अदखलपात्र गुन्हा नोंद करून तपासाच्या सत्रासापासून आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांना सविस्तर घटना सांगूनही त्यांनी ती विस्तृतपणे न नोंदवता आपल्या मर्जीनुसार तक्र ार नोंदविल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता असतानाही पोलिसांनी सुरु वातीस दुर्लक्ष केले त्यामुळे नेरळ पोलिसांकडून आरोपीना पाठीशी घातले गेल्याचा आरोप या पीडित महिलेने केला आहे. या संदर्भात नेरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बातमी छापण्यासारखी ही गोष्ट नाही अशी प्रतिक्रि या दिली.

Web Title: In Karjat, a woman was thrashed in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.