कर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:36 PM2020-09-27T23:36:14+5:302020-09-27T23:37:35+5:30

महिलांनी उठविला आवाज : महिन्याभरात रस्ता बनविला नाही, तर आंदोलन

In Karjat, women planted trees in pits | कर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

कर्जतमध्ये नारीशक्तीने केले खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

Next

कर्जत : गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत-दहिवली रस्ता करण्यात आला नसल्याने, रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महिला नारीशक्ती संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात घोषणाबाजी करत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत-दहिवली हा रस्ता शासनाने मंजूर केला असतानाही ठेकेदाराकडून करून घेतला नाही. त्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, कर्जत शहरात काम करणाऱ्या नारी शक्तीने याविरोधात आवाज उठविला आहे.

कर्जत-दहिवली हा रस्ता मुरबाड ला जोडला गेल्याने या रस्त्यावरून जड वाहनांबरोबर अन्य वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे, तसेच पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहे. काहींचे तर रात्री अपरात्री खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकाचे प्राण गेले आहे. ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तर या रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. याबाबत विविध पक्षांनी निवेदन दिले मोर्चा काढला, तरीही रस्ता झाला नाही. नारीशक्तीच्या स्विटी बार्शी, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, वर्षा डेरवणकर, सुप्रिया मोरे, कमल जाधव, नानी गुरव, सुनीता गाडे, मालती वाडगावकर, आशा गाडे आदी महिला उपस्थित होत्या.

‘सध्या कर्जतमध्ये रस्त्याची चांगलीच चाळण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यामुळे अपघात घडत आहे. काळजीपूर्वक किती वाहणे चालवीत असूनही अपघात घडत आहे, तर स.बां. विभागाला जाग येत नाही.
- स्वीटी बार्शी, महिला कार्यकर्त्या

कर्जत नगरपरिषद हद्दीतील कर्जत दहिवली गावातून जाणारे रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध नोंदविला आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने काँक्रिटच्या कामांना लवकरात लवकर निविदा काढून कामाला सुरुवात करावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा नक्की केला जाईल.’
- शरद लाड, विरोधी पक्षनेते, कर्जत नगरपरिषद

‘कर्जत-दहिवली रस्ता नव्याने करण्याकरिता अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने का केला नाही हे गुलदस्त्यात आहे.’
- रजनी गायकवाड, माजी नगराध्यक्ष

Web Title: In Karjat, women planted trees in pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.