शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:48 AM

राज्याच्या सायबर सेलचेही दुर्लक्ष?

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विरोधात टाकलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यास केतकी चितळे हिने पोलिसांना नकार दिला आहे. आपल्या मर्जीनेच आपण ती टाकल्याच्या निर्णयावर ती अद्यापही ठाम आहे. परंतु, या पोस्टमुळे अद्यापही वाद उफाळून येत असतानाही सायबर सेलकडून ती हटवली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला अटक केली आहे. तिच्या पोस्टमुळे राज्यात राजकीय वाद उफाळून आला आहे. यामुळे ती पोस्ट हटवण्यासंदर्भात पोलिसांनी केतकीला सूचना केल्या आहेत. परंतु, तिने पोस्ट हटवण्यास नकार देऊन आपल्या मर्जीने ती पोस्ट टाकल्याचे सांगितले आहे. यामुळे अद्यापही त्या पोस्टवर वादग्रस्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अशातच सायबर सेलनेदेखील ती पोस्ट हटवलेली नाही. त्यामुळे पोस्टवर अद्यापही नवे वाद निर्माण होतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. सायबर सेलने अद्यापही पोस्ट न हटवण्यामागचे नेमके कारण काय, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. 

केतकीवर २०२० मध्ये जातिवाचक पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात मागील तीन दिवसांपासून चौकशीसाठी ती नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. यादरम्यान तिच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन विशेष उपाय करून तिला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. 

सुनावणी लांबणीवरठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी  फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने तूर्तास राखून ठेवला आहे. त्यावर आता  २६ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. या गुन्ह्यात तिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी  सुनावली आहे.

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेSharad Pawarशरद पवार