केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:09 AM2019-02-19T03:09:05+5:302019-02-19T03:09:18+5:30

पर्यायी पुलाची गरज : अरुंद पुलामुळे अपघाताची शक्यता

Kewale bridge becomes dangerous, alternative bridge needs | केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

केवाळे ब्रिज बनला धोकादायक, पर्यायी पुलाची गरज

Next

मयूर तांबडे

पनवेल : तालुक्यातील केवाळे जवळील अरुंद पुलामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या पुलाला खालील बाजूस असणारे स्टील गंजू लागले असल्याने हा पूल धोकादायक बनला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे दुसरा पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पनवेल तालुक्यातील केवाळे गावाजवळ असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत वाकडी व केवाळे गावाला जोडण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार न करता हा पूल बांधण्यात आला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पूल अरुंद असल्याने एका वेळी एकच चारचाकी गाडी जात आहे त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या खाली बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. खालील बाजूचे सिमेंटचे प्लास्टर देखील गळू लागले आहे. त्यामुळे या पुलाची डागडुजीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दुसरा पूल देखील आवश्यक आहे. या भागात केवाळे, वाकडी, चिंचवली, उसर्ली, दुंदरे, मोरबे यांच्यासह आदिवासी वाड्यांचे प्रमाण अधिक आहे. पनवेल परिसरात विमानतळ होत असल्याने या परिसराचा कायापालट होताना दिसत आहे. त्यामुळे मोठमोठ्या इमारती व नवनवीन प्रोजेक्ट या परिसरात येत आहेत. मात्र अरुंद पुलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुलाखालील बांधकामाचे स्टील गंजू लागल्याने तो खचण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.

केवाळे येथील हा जुना पूल पाडून त्याजागी दुसरा मोठा व रु ंद नवीन पूल बांधण्यात येणार आहे. लवकरच त्या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आली आहे.

केवाळे येथील पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी व दुसरा पूल बांधण्यात यावा. ङ्क्त
- रमेश पाटील,
उपसरपंच, दुंदरे ग्रामपंचायत

Web Title: Kewale bridge becomes dangerous, alternative bridge needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.