वंडर्स पार्कला उतरती कळा; निम्याहून अधिक खेळणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:20 AM2019-12-13T00:20:02+5:302019-12-13T00:20:24+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष

 Keys descending to Wonders Park; More than half the toys closed | वंडर्स पार्कला उतरती कळा; निम्याहून अधिक खेळणी बंद

वंडर्स पार्कला उतरती कळा; निम्याहून अधिक खेळणी बंद

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी, धोकादायक आणि नादुरु स्त झाल्याने बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, सद्यस्थितीमध्ये निम्याहून अधिक खेळणी वापरासाठी बंद आहेत. तसेच पार्कमध्ये विविध समस्यांचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधांच्या कामरतेमुळे पार्कमध्ये येणारे नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत असून, याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबई महापालिकेने नेरु ळ सेक्टर १९ येथे वंडर्स पार्कची निर्मिती केली आहे. या पार्कमुळे शहराच्या आकर्षणात भर पडली असून, शहराचा नावलौकिकही वाढला आहे. पार्कमध्ये मिनी टॉय ट्रेन, आकाश पाळणा, ब्रेक डान्स, फेसबी, जम्पिंग मिकी माउस, बंजी जम पेंडल कार, आॅक्टोपस, क्रि केट, टायर असलेली टॉय ट्रेन आदी आकर्षक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. त्यामुळे या पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

पार्कमध्ये बसविण्यात आलेली खेळणी जुनी झाली असून, वेळेवर देखभाल दुरु स्ती होत नसल्याने खेळणी वारंवार नादुरु स्त होत आहेत. पार्कमधील या सर्व लोखंडी खेळण्यांना गंज लागला असून, अनेक अवजड खेळणी वेल्डिंग करून चालविण्यात येत आहेत. खेळण्यांची देखभाल दुरु स्ती होत नसल्याने तसेच महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने यापूर्वी अनेक खेळण्यांचे अपघात घडले असून, नागरिक व लहान मुले जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. पार्कमधील फेसबी आणि आॅक्टोपस पाळणा ही खेळणी धोकादायक स्थितीमध्ये असून, एप्रिल महिन्यापासून बंद आहेत.

पार्कमधील नेट क्रि केट मे महिन्यापासून बंद असून लहान टॉय ट्रेन जून महिन्यापासून बंद आहे. पार्कमध्ये येणाºया लहान मुलांसाठी उभारण्यात आलेला मिकी माउस फुगा सुमारे दीड महिन्यापासून बंद आहे. पार्कमधील दहा प्रमुख खेळण्यांपैकी सदर पाच खेळणी बंद असून, मोठी टॉय ट्रेन, ब्रेक डान्स, आकाश पाळणा, बंजी जंप आणि पेंडल कार ही पाच खेळणी सुरू आहेत. पार्कमधील बंद खेळण्यांची माहिती पार्कच्या प्रवेशद्वारावर फलकाच्या माध्यमातून देण्यात आली नसल्याने प्रवेशाचे तिकीट काढून पार्कमध्ये प्रवेश केल्यावर बंद खेळणी पाहून नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत आहे.

सापांचा वावर

वंडर्स पार्क विकसित करण्यात आलेला भूखंड पडीक होता. या परिसरात विविध साप मोठ्या प्रमाणावर होते. वंडर्स पार्कची निर्मिती करण्यात आल्यावरही सापांचा वावर कमी झाला नसून, पार्कमध्ये काम करणाºया कर्मचाऱ्यांना पार्कच्या आवारात दररोज विविध प्रजातींच्या साप, नागांचे दर्शन होते. गुरु वार, १२ डिसेंबर रोजी सर्पमित्रांनी पार्कच्या आवारात एक नाग पकडला. पार्कमध्ये सापांच्या वावरामुळे नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 

Web Title:  Keys descending to Wonders Park; More than half the toys closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.