शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये खदखद; कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 11:59 PM

सुबीन थॉमस यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : युवक काँग्रेसच्यानवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुबीन थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुबीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हते. त्यांची नियुक्ती करताना पक्षाने आपणालाही विश्वासात घेतले नसल्याची खंत काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी व्यक्त केली आहे.

युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी २७ डिसेंबर, २0१९ रोजी मुलाखती झाल्या. विशेष म्हणजे युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून मुलाखतीसाठी येणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये विजय पाटील, पकंज जगताप, शार्दूल कौशिक, अनिकेत म्हात्रे व रवी जाधव यांच्या नावाचा समावेश होता. युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यामुळे चौघांपैकी एकाची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागेल, असे आडाखे बांधले जात होते, परंतु २ सप्टेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीने सुबीन थॉमस यांच्या नावाची घोषणा करून सर्व इच्छुक व त्यांचा समर्थकांना धक्का दिला.

सुबीन थॉमस नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये सक्रिय नाहीत, शिवाय पक्षाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. असे असतानाही त्यांची थेट युवक काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची ही कृती संशय निर्माण करणारी असल्याचा आरोप नवी मुंबईतील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. सुबीन यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संतापाचे जनक ठरले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी तांबे यांना लक्ष्य केले आहे.

नवी मुंबई काँग्रेस पक्षाची अगोदरच वाताहत झाली आहे. गटबाजीमुळे पक्षात फूट पडली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, परंतु नवी मुंबईत काँग्रेसची झालेली वाताहत पाहता, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीकडून काँग्रेसला फारशा जागा सोडल्या जाण्याची शक्यता कमीच आहे. ही वस्तुस्थिती असतानाही प्रदेश युवक काँग्रेस कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षपदाचा घोळ घालून ठेवल्याची टीका नवी मुंबईतील युवक कार्यकर्त्यांनी केली.

जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार असलेले पंकज दिलीप जगताप यांनी नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची करण्यात आलेली निवड अयोग्य आहे. त्याचे दुरगामी परिणाम पक्ष संघटनेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवड अवैध ठरवावी, अशी मागणी पंकज जगताप यांनी केली आहे.

युवक अध्यक्षपदाचे दावेदार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांचा पुतण्या पंकज जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा पुत्र शार्दुल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा पुत्र अनिकेत म्हात्रे, तुर्भे गावातील युवा कार्यकर्ते विजय पाटील व बेलापूरचे रवी जाधव हे नवी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद शर्यतीत होते. ते पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला उपस्थित होते. सुबीन थॉमस यांचा पक्षातील सहभाग नगण्य आहे, त्यांनी मुलाखतही दिली नव्हती.

नवीन नेतृत्वाला संधी देण्याबरोबरच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समतोल साधण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्यानुसार, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मान्यतेने सुबीन यांची नवी मुंबई युवक अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.- विश्वजीत तांबे, अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी

टॅग्स :congressकाँग्रेसNavi Mumbaiनवी मुंबई