खांदेश्वरमधील गाळे धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:05 AM2018-08-31T04:05:48+5:302018-08-31T04:06:36+5:30

सिडकोचे दुर्लक्ष : सामाजिक कार्यासाठी वापराचीही परवानगी नाही

Khandeshwar lanes and shops fall in the dust | खांदेश्वरमधील गाळे धूळखात पडून

खांदेश्वरमधील गाळे धूळखात पडून

googlenewsNext

कळंबोली : सिडकोने खांदेश्वर मंदिर परिसरामध्ये दहा वर्षांपूर्वी आठ गाळे बांधले आहेत, परंतु अद्याप त्याचा वापर केला जात नाही. सामाजिक उपक्रमासाठी वापर करण्याचीही परवानगी दिली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक कपूर असताना त्यांनी २००८ मध्ये खांदेश्वर मंदिर परिसर आणि तलावाचे सुशोभीकरण केले. त्याचबरोबर बाजूला असलेल्या उद्यानाचा विकास केला.तिथे चिल्ड्रन पार्क, नर्सरी त्याचबरोबर इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचवेळी उद्यानाच्या बाजूलाच एकूण आठ लहान गाळे बांधण्यात आले. त्यामध्ये विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्र ी हा या पाठीमागचा उद्देश होता. मात्र दीपक कपूर आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय दाहेदार यांची बदली झाल्यानंतर या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच हे गाळ्यांचा सुध्दा वापर करण्यात आला नाही. आजच्या घडीला या गाळ्यांची अवस्था बिकट आहे. वरती गवत वाढले असून आतमध्ये जाळे जळमाटे झाले आहेत. शटर गंजले आहे, समोर दलदल असल्याने एक प्रकारे घसरगुंडी तयार झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजूला स्वर्गीय दि.बा. पाटील व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र सिडकोकडून गेल्या दहा वर्षांत कोणताही कार्यवाही करण्यात आली नाही. अलर्ट सिटीझन फोरम, योगा मॉर्निंग ग्रुप आणि संजय भोपी सोशल क्लबच्या वतीने या ठिकाणी वाचनालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी जागेची मागणी सुध्दा त्यांनी सिडकोकडे केली होती, तसेच वारंवार पाठपुरावा सुध्दा केला होता. मात्र सिडकोकडून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता पी.एस. फुलारी यांना विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो, असे म्हणाले, कार्यकारी अभियंता भगवान साळवी प्रतिक्रियेस उपलब्ध होऊ शकले नाहीत.

खांदा वसाहतीतील माझे वाचनालय सुरू करण्याचा आमचा मानस आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे हजारो पुस्तके जमा झालेली आहेत. मात्र सिडकोकडून खांदेश्वर मंदिर परिसरातील बंद गाळे उपलब्ध करून दिले जात नाही. या आडमुठ्या धोरणामुळे आजच्या घडीला हे गाळे धुळीचे बाहुले बनले आहे.
- संजय भोपी, नगरसेवक, पनवेल महापालिका
 

Web Title: Khandeshwar lanes and shops fall in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.