पनवेल : खारघर ते पनवेल या मार्गावर एनएमएमटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेविका संजना समीर कदम यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या खारघर शहरात जवळपास ४0 सेक्टर आहेत. नागरिकांना विविध कामांसाठी पनवेल तहसील, प्रांत, पंचायत समिती आणि पनवेल पालिकेच्या मुख्यालयात नेहमीच जावे लागतात.जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत येथील बाजारपेठेचा उल्लेख आजही होतो. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रहिवासी, जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात जावे लागते. याशिवाय खारघर सेक्टर २५ ते ४0 परिसरातील नागरिकांना कोपरा अथवा हिरानंदानी बस थांब्यावर जाण्यासाठी ५0 ते १00 रु पये रिक्षासाठी खर्च करावे लागतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने रॅपिड अॅक्शनफोर्स, सेक्टर ३४, रामशेठ ठाकूर कॉलेज, रांजणपाडा, वास्तुविहार, घरकूल, डेली बाजार आणि शिल्प चौक व हिरानंदानी मार्गे पनवेल या मार्गावर बससेवा सुरू केल्यास नागरिकांची चांगली सोय होईल आणि परिवहनच्या उत्पन्नातहीवाढ होईल. परिवहन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून बससेवा सुरू करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
खारघर - पनवेल एनएमएमटी सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:34 AM