खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 02:42 AM2019-01-02T02:42:43+5:302019-01-02T02:46:30+5:30

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे.

Kharghar on the golf course controversy; Tables presented in grass | खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल

खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे.
गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पातील नियम व अटी अतिशय कडक आहेत. गोल्फर्स वगळता या ठिकाणच्या गवतावर चालण्यास सक्त मनाई असताना पार्टीसाठी थेट गवतावर टेबल मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे, गोल्फ कोर्स व्हॅली क्लब आणि पवित्रा यांच्यामार्फत आयोजित पार्टीची रीतसर जाहिरातही करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी ७५० रु पये फी आकारण्यात आली होती.
खारघर शहरात सेक्टर २३, २४, २५ या ठिकाणी सुमारे १०३ हेक्टरवर गोल्फ कोर्स प्रकल्प तयार करण्यात आला असून, आॅस्ट्रेलिया येथील मेलबर्न स्थित कंपनीने ते डिझाइन केले आहे. तब्बल ५० कोटी खर्चून या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये क्लबहाउसचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. गोल्फ संबंधित स्पर्धांच्या आयोजनानंतर खेळाडूसाठी विश्रामगृह, तसेच हॉटेल्सच्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने या क्लबहाउसची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी पार्टी रंगल्याने वाद निर्माण झाला आहे.
गोल्फ कोर्सच्या पार्टीसाठी शेकडोच्या संख्येने क्लब हाउसमध्ये नागरिक दाखल झाले होते. यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांचाही सामावेश असल्याचे बोलले जात आहे. सिडकोचे कंपनी सेक्रे टरी प्रदीप रथदेखील पार्टीत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिडकोचे प्रशासक रमेश गिरी यांनी कोणत्या आधारावर या पार्टीला परवानगी दिली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोल्फ कोर्स प्रकल्पात ठिकठिकाणी सूचना फलकदेखील लावण्यात आलेले आहेत.आयपीआय ही कंपनी गोल्फ कोर्स व्हॅलीमधील क्लबहाउसच्या देखरेखीचे काम पाहत आहे. मात्र, या सूचना या पार्टीत पायदळी तुडविण्यात आल्या आहेत.

गोल्फकोर्सवर पार्टीचे आयोजन करणारे आणि परवानगी देणाºयांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात येईल.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

गोल्फ कोर्समध्ये आयोजित पार्टीबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रिया रातंबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Kharghar on the golf course controversy; Tables presented in grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.