खारघरवासीयांची पसंती नवी मुंबईला

By admin | Published: August 22, 2015 12:07 AM2015-08-22T00:07:25+5:302015-08-22T00:07:25+5:30

एकीकडे पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होत असताना खारघरमधील नागरिकांनी आपली पसंती नवी मुंबई महानगरपालिकेला दाखविली आहे

Kharghar preferred the Navi Mumbai to the Navi Mumbai | खारघरवासीयांची पसंती नवी मुंबईला

खारघरवासीयांची पसंती नवी मुंबईला

Next

पनवेल : एकीकडे पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होत असताना खारघरमधील नागरिकांनी आपली पसंती नवी मुंबई महानगरपालिकेला दाखविली आहे. खारघर शहराला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी खारघर हौसिंग फेडरेशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नवी मुंबई महानगपालिका योग्य सोयी-सुविधा पुरवू शकते, असे फेडरेशनचे म्हणणे आहे.
सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केली. खारघर, कामोठे आदी सिडकोने नव्याने उभारलेल्या वसाहती आहेत. याठिकाणी मूलभूत नागरी सुविधा सिडकोकडून पुरविल्या जात आहेत. पनवेल तालुक्यात येणाऱ्या खारघर, कामोठे, तळोजा आदी शहरांचा पनवेल पालिकेत समावेश करून याठिकाणी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी, अशी लक्षवेधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत मांडली होती. सरकारने यासाठी नव्याने अधिसूचना काढण्याचे धोरण अवलंबले. मात्र पनवेल नगरपरिषद ही शहरात प्राथमिक सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे भविष्यात देखील हीच परिस्थिती उद्भवेल. खारघर शहर पनवेलला जोडल्यास नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे खारघर हे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kharghar preferred the Navi Mumbai to the Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.