नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. खारघरवासी कित्येक महिन्यापासून खड्ड्यांमुळे त्रस्त होते. मात्र तरीही रस्त्यांची दुरुस्ती होत नव्हती. अखेर आज मोदींच्या सभेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे खारघरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खारघरमधील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून खड्ड्यांमुळे त्रासले होते. सर्वच रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे गाड्या चालवताना लोकांची पुरती दमछाक व्हायची. याबद्दलची तक्रार अनेकदा महापालिकेकडे करुनही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. निवडणूक जवळ आल्यानं लोकप्रतिनिधींनादेखील याकडे पाहायला फारसा वेळ नव्हता. अखेर पंतप्रधानांमुळे रस्ते खड्डेमुक्त झाले. पंतप्रधान मोदींच्या खारघरमधील सभेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामं वेगानं सुरू झाली. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे खारघरमधील रस्ते अगदी चकाचक झाले. मोदींमुळे का होईना, रस्ते खड्डेमुक्त झाल्यानं खारघरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान मोदी येती घरा, रस्त्यावरचे खड्डे विसरा; खारघरमधील रस्ते झाले चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 5:02 PM