खारघर खऱ्या अर्थाने दारूमुक्त

By Admin | Published: April 10, 2017 06:01 AM2017-04-10T06:01:15+5:302017-04-10T06:01:15+5:30

नवी मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात खारघर या विकसित शहराचा आवर्जून उल्लेख केला जात असला तरी गावे

Kharghar is the true liquor-free | खारघर खऱ्या अर्थाने दारूमुक्त

खारघर खऱ्या अर्थाने दारूमुक्त

googlenewsNext

वैभव गायकर / पनवेल
नवी मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात खारघर या विकसित शहराचा आवर्जून उल्लेख केला जात असला तरी गावे, आदिवासी पाडे ही या शहराची मूळ ओळख. नवी मुंबई प्रकल्प आल्यानंतर देशभरातील नागरिक याठिकाणी स्थायिक झाले. २००२ मध्ये शहराचा भाग असलेल्या कोपरा गावात अजित पॅलेस नावाचा बार आणि रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने खारघर शहरात दारूमुक्तीचा लढा सुरू झाला. तब्बल १५ वर्षांनंतर का होईना, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने अखेर खारघर शहर दारूमुक्त झाले आहे.
शहरात दारूविक्र ीचे एखादे दुकान सुरू झाले की गावठाण - शहरातील लोकांनी एकत्र येऊन त्यास प्रखर विरोध केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंपासून सर्वच समाजसेवकांची भेट यासाठी संघर्ष समितीने घेतली होती. त्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. वेळोवेळी निदर्शनेही करण्यात आली होती. या प्रखर विरोधामुळे खारघर शहरात आजवर एकही अधिकृत दारूचे दुकान नाही. ज्या ठिकाणी
दारूविक्र ी होतहोती ते हॉटेल अजित पॅलेस आणि हॉटेल रॉयल ट्युलिप या हॉटेललाही सुप्रीम कोर्टाचा नियम लागू होत असल्याने आपोआपच याठिकाणची दारूविक्र ी बंद झाल्याने अखेर खारघर पूर्णत: दारूमुक्त झाले आहे.
खारघर शहर दारूमुक्त करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी रमेश मेनन यांना विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. न्यायालयीन लढाई असो वा समाजकंटकांच्या धमक्यांचा यांनी सामना केला.

Web Title: Kharghar is the true liquor-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.